IND vs SL 2nd ODI Int Live Score : युवा फलंदाजांची आक्रमकता आणि त्याला अनुभवी फलंदाज शिखर धवनच्या संयमाची मिळालेली साथ या जोरावर भारताने पहिल्या वन डे सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवला. टीम इंडियानं मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा निर्धार टीम इंडियाचा आहे. श्रीलंकेनं पुन्हा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिल्या वन डेत भारतीय खेळाडूंनी अपेक्षित कामगिरी केली. इशान किशन, पृथ्वी शॉ यांनी आक्रमक खेळी करत यजमानांना दबावाखाली ठेवले. त्याचवेळी एक बाजू लावून धरताना कर्णधार शिखर धवनने संयमी खेळीसह लंकेला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संघात बदल होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. कारण, दुसरा सामना जिंकल्यानंतर औपचारिकतेचा ठरणाऱ्या तिसऱ्या सामन्यात राखीव खेळाडूंना संधी देण्याचा विचार प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडून होईल.भारतीय संघ - शिखर धवन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, दीपक चहरलंकेविरुद्ध सर्वाधिक वन डे जिंकणारे संघ
संघ सामने विजय पराभव टाय अनिर्णीत
पाकिस्तान १५५ ९२ ५८ १ ४
भारत १६० ९२ ५६ १ ११
ऑस्ट्रेलिया ९७ ६१ ३२ ० ४
न्यूझीलंड ९९ ४९ ४१ १ ८
द. आफ्रिका ७७ ४४ ३१ १ १