Join us  

IND Vs SL 2nd ODI Live : युजवेंद्र चहल, भुवनेश्वर यांनी विकेट घेतल्या; तरीही श्रीलंकेनं पहिल्या वन डेपेक्षा जास्त धावा केल्या!

India vs SL 2nd ODI live Updates Score Today :युजवेंद्रनं या सामन्यात १० षटकांत ५० धावांत ३ बळी टिपले. भुवनेश्वरनं 54 धावांत 3 विकेट्स घेतल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 6:47 PM

Open in App
ठळक मुद्देयुजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

IND vs SL 2nd ODI Int Live Score : पहिल्या वन डेतील पराभवानंतर यजमानांचा संघ आज बुस्ट होऊन मैदानावर उतरलेला पाहायला मिळाला. पण, युजवेंद्र चहलच्या फिरकीनं त्यांच्या धावगतीला मधल्या षटकांत ब्रेक लावला. अविष्का फर्नांडो आणि चरिथ असलंका यांच्या अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेनं टीम इंडियासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभं केलं. पहिल्या वन डेत श्रीलंकेनं २६३ धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि त्यापेक्षा अधिक लक्ष्य उभे करण्यात श्रीलंकेला यश मिळाले. 

अविष्का फर्नांडो आणि मिनोद भानूका यांनी श्रीलंकेला चांगली सुरुवात करून देताना पहिल्या विकेटसाठी ७७ धावा जोडल्या. आजही टीम इंडियाच्या जलदगती गोलंदाजांना सुरूवातीला विकेट मिळवून देण्यात अपयश आलं. मागील सामन्यात कुलदीप यादवनं एका षटकात दोन धक्के दिले होते अन् आज युजवेंद्र चहलनं सलग दोन विकेट्स घेत टीम इंडियाला पुनरागमन करून दिले. १४व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर युजीच्या गोलंदाजीवर पुढे येऊन मारण्याचा मिनोदचा प्रयत्न फसला अन् मनीष पांडेनं त्याचा सोपा झेल टिपला. मिनोद ४२ चेंडूंत ६ चौकारांसह ३६ धावांवर माघारी परतला, पुढच्याच चेंडूवर भानुका राजपक्ष ( ०) भोपळा न फोडताच यष्टिरक्षक इशान किशनच्या हाती झेल देऊन बाद झाला.Ind vs SL 2021, Ind vs SL 2021 2nd ODI

अविष्का आणि धनंजया डी सिल्व्हा यांनी लंकेचा डाव सावरलाच होता. अविष्कानं ७१ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह अर्धशतक पूर्ण केले अन् भुवनेश्वर कुमारनं ही महत्त्वाची विकेट घेतली. त्यानंतर दीपक चहरनं श्रीलंकेचा सेट फलंदाज धनंजया ( ३२) याला बाद केले. या दोन महत्त्वाच्या विकेट्सनंतर श्रीलंकेच्या धावांचा वेग मंदावला. कर्णधार दासून शनाका ( १६) याला चहलनं बाद केले. श्रीलंकेचा निम्मा संघ १७२ धावांत तंबूत परतला. Ind vs SL 2021 Live Score, Ind vs SL 2021 Live Updates

चरिथ असलंका आणि चमिका करुणारत्ने या जोडीनं पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. या जोडीनं धावा व चेंडू यांच्यातला ताळमेळ राखताना श्रीलंकेला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं कूच करून दिली. असलंकानं अर्धशतक पूर्ण करताना टीम इंडियाच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या सामन्यात ५२ धावांत २ विकेट्स घेणाऱ्या युजवेंद्रनं या सामन्यात १० षटकांत ५० धावांत ३ बळी टिपले. कुलदीप यादवला १० षटकांत ५५ धावा देऊन एकही विकेट घेता आली नाही. असलंका ६८ चेंडूंत ६ चौकारांसह ६५ धावांत माघारी परतला. भुवीची ही आजच्या सामन्यातील दुसरी विकेट ठरली. ( Charith Asalanka, brilliant Innings of 65 in 68 deliveries). करुणारत्नेनं श्रीलंकेला ५० षटकांत ९ बाद २७५ धावांपर्यंत मजल मारून दिली. करुणारत्ने नाबाद ४४ धावा केल्या. IND VS SL Live ODI Match Today, IND VS SL Live 2nd ODI  

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाभुवनेश्वर कुमारयुजवेंद्र चहल