IND vs SL 2nd ODI Int Live Score : दुसऱ्या वन डे सामन्याच्या नाणेफेकीचा कौलही यजमान श्रीलंकेच्या बाजूनं लागला अन् त्यांनी पुन्हा प्रथम फलंदाजी करून टीम इंडियासमोर लक्ष्य ठेवण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेनं आजच्या सामन्यात इसुरू उदानाच्या जागी कनुसा रंजिथाला संधी दिली आहे, तर टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एकही बदल झालेला नाही. संजू सॅमसनला दुखापतीमुळे पहिल्या वन डे सामन्यात खेळता आले नव्हते, अन् मनिष पांडेच्या अपयशानंतर तो आजच्या सामन्यात खेळणं अपेक्षित होतं. पण, कर्णधार शिखर धवननं तोच संघ कायम राखल्यानं संजूच्या दुखापतीबाबत चाहत्यांना चिंता वाटू लागली.
मनिष पांडेला पहिल्या वन डे सामन्यात संधी मिळूनही चांगली खेळी करता आली नाही, त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्या जागी संजूला संधी मिळण्याची चर्चा सुरू होती. पण, धवनच्या निर्णयानं ती फोल ठरली. त्याचवेळी बीसीसीआयनं संजूच्या दुखापतीबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत. ''संजू सॅमसन गुडघ्याच्या दुखापतीतून सावरला असून तो मालिकेतील पुढील सामन्यात सिलेक्शनसाठी उपलब्ध आहे. बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमनं त्याला तंदुरुस्त घोषित केले आहे,''असे बीसीसीआयनं स्पष्ट केले.
भारतीय संघ - शिखर धवन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, दीपक चहर ( IND XI: Prithvi Shaw, Shikhar Dhawan(c), Ishan Kishan(w), Manish Pandey, Suryakumar Yadav, Hardik Pandya, Krunal Pandya, Deepak Chahar, Bhuvneshwar Kumar, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav)
श्रीलंकेचा संघ - अविष्का फर्नांडो, मिनोद भानूका, भानूका राजपक्षा, धनंजया डी सिल्व्हा, चरीथ असालंका, दासून शनाका, वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, इशान जयरत्ने ( SL XI: Avishka Fernando, Minod Bhanuka(w), Bhanuka Rajapaksa, Dhananjaya de Silva, Charith Asalanka, Dasun Shanaka(c), Wanindu Hasaranga, Chamika Karunaratne, Kasun Rajitha, Dushmantha Chameera, Ishan Jayaratne)
Web Title: India vs SL 2nd ODI : Sanju Samson has recovered from the injury and is available for the selection in the rest of the series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.