IND vs SL 2nd T20I Int Live Score : पाच स्पेशालिस्ट फलंदाजांसह मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक लावलेला दिसला. संघातील सर्वात अनुभवी फलंदाज कर्णधार शिखर धवननं ४० धावांची खेळी केली, परंतु अन्य फलंदाज अपयशी ठरले. संजू सॅमसननं आणखी एक संधी गमावली अन् विचित्र पद्धतीनं बाद होऊन तो माघारी परतला.
कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर भारत-श्रीलंका ट्वेंटी-२० मालिकेत गोंधळ उडाला. कृणालच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी ते विलगिकरणात असल्यानं त्यांना उर्वरित मालिकेत खेळता येणार नाही. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी चार नव्या चेहऱ्यांना टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. २००७मध्ये स्कॉटलंडविरुद्ध भारतानं एकाच सामन्यात चार पदार्पणवीर उतरवले होते. Ind vs SL 2021, Ind vs SL 2021 2nd T20I
श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, नितिश राणा आणि चेतन सकारिया या चार खेळाडूंनी पदार्पण केले. देवदत्त पडिक्कल हा २१ व्या शतकात जन्मलेला व टीम इंडियाकडून पदार्पण करणारा पहिलाच खेळाडू ठरला. शिखर धवननं मोडला विराट कोहलीचा विक्रम, श्रीलंकेविरुद्ध ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला. शिखर धवनने ( ३४०*) धावा करत विराट कोहली ( ३३९), लोकेश राहुल ( २९५ ), रोहित शर्मा (२८९) व सुरेश रैना ( २६५ ) यांना मागे टाकले. Ind vs SL 2021 Live Score, Ind vs SL 2021 Live Updates