IND Vs SL 2nd T20I Live : श्रीलंकेनं दोन विकेट्स गमावल्या, राहुल चहरनं सॉलिड कॅच घेतला, Video  

IND vs SL 2nd T20I Int Live Score : भारताच्या १३३ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेनं ३९ धावांत दोन विकेट्स गमावल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 10:28 PM2021-07-28T22:28:50+5:302021-07-28T22:29:38+5:30

whatsapp join usJoin us
India vs SL 2nd T20I live : What a catch was that by Rahul Chahar, Bhuvneshwar Kumar claim 50 T20i wickets, Video  | IND Vs SL 2nd T20I Live : श्रीलंकेनं दोन विकेट्स गमावल्या, राहुल चहरनं सॉलिड कॅच घेतला, Video  

IND Vs SL 2nd T20I Live : श्रीलंकेनं दोन विकेट्स गमावल्या, राहुल चहरनं सॉलिड कॅच घेतला, Video  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs SL 2nd T20I Int Live Score : भारताच्या १३३ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेनं ३९ धावांत दोन विकेट्स गमावल्या. भुवनेश्वर कुमारनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं, त्यानंतर वरुण चक्रवर्थीनं विकेट घेतली. भुवीच्या गोलंदाजीवर अविष्का फर्नांडोनं उत्तुंग फटका मारला, चेंडू सीमापार जाईल असे वाटत असताना राहुल चहरनं अफलातून झेल घेतला. त्यानंतर चक्रवर्थीनं सदीरा समराविक्रमाचा ( ८) त्रिफळा उडवला. 

शिखर धवननं एकाकी झुंज दिल्यामुळे टीम इंडियानं दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात श्रीलंकेसमोर १३३ धावांचे लक्ष्य ठेवले. शिखरनं ४० धावांची खेळी केली, त्याला देवदत्त पडिक्कल ( २९) व ऋतुराज गायकवाड ( २१) या पदार्पणवीरांची साथ मिळाली. संजू सॅमसनचं अपयश हे टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत आहे. या सामन्यात श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी चांगली कामगिरी केली.  Ind vs SL 2021, Ind vs SL 2021 2nd T20I

पदार्पणवीर ऋतुराज गायकवाड आणि शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. देवदत्त पडिक्कल आणि शिखर यांची ३२ धावांची भागीदारी अकिला धनंजयानं संपुष्टात आणली. देवदत्त व संजू सॅमसन यांना मोठी खेळण्याची संधी होती, परंतु त्यांनाही खुलून फटके मारता आले नाही. वनिंदु हसरंगा यानं टाकलेल्या १६व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर देवदत्तनं सुरेख रिव्हर्स स्वीप मारून चौकार मिळवला, परंतु पुढच्याच चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. सॅमसनही ( ७)  पुढच्या षटकात धनंजयाच्या गोलंदाजीवर बाद झाला. भारताला २० षटकांत ५ बाद १३२ धावा करता आल्या. Ind vs SL 2021 Live Score, Ind vs SL 2021 Live Updates

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेनं आक्रमक सुरुवात केली, परंतु राहुल चहरनं सुरेख झेल टिपून लंकेला पहिला धक्का दिला. भुवनेश्वर कुमारनं ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ५० वी विकेट घेतली. युजवेंद्र चहल ( ६३), जसप्रीत बुमराह ( ५९) आणि आर अश्विन ( ५२) यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ५० विकेट्स घेणारा भुवी चौथा भारतीय गोलंदाज ठरला.IND Vs SL 2021, IND VS SL Live ODI Match Today 

पाहा चहरनं घेतलेली भन्नाट कॅच



Web Title: India vs SL 2nd T20I live : What a catch was that by Rahul Chahar, Bhuvneshwar Kumar claim 50 T20i wickets, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.