India vs Sri Lanka 3rd T20I : कृणाल पांड्याचे कोरोना पॉझिटिव्ह होणे, त्याच्या संपर्कात आलेल्या ८ प्रमुख खेळाडूंना विलगिकरणात जावे लागल्यानंतर हाताशी असलेल्या खेळाडूंसह टीम इंडियाला मैदानावर उतरणे भाग होते. त्याचा फटका टीम इंडियाला बसलाच... श्रीलंकेनं ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या लढतीत टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव पत्करण्यास भाग पाडले. या विजयासह श्रीलंकेनं तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. २००८नंतर श्रीलंकेचा टीम इंडियावरील हा पहिलाच मालिका विजय आहे.
पहिल्याच षटकात धक्का बसल्यानंतर टीम इंडियाला तिसऱ्या ट्वेंटी-२० सावरणं अवघड गेलं. टीम इंडियाला ट्वेंटी-२०त शंभर धावांचा पल्लाही ओलांडता आला नाही. श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षकांनी अफलातून झेल घेतले. वनिंदू हसरंगानं ४ षटकांत ९ धावांत ४ विकेट्स घेतल्या. वनिंदूची ही ट्वेंटी-२०तील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. पहिल्याच षटकात दुष्मांता चमिराच्या चेंडूवर शिखर धवन स्लीपमध्ये झेल देऊन माघारी परतला. त्यापाठोपाठ देवदत्त पडिक्कल ( ९), संजू सॅमसन ( ०) व ऋतुराज गायकवाड ( १४) हेही अपयशी ठरले. IND Vs SL 2021, IND VS SL Live T20I Match Today
टीम इंडियाची अखेरची होप नितिश राणा यालाही ६ धावांवर माघारी परतावे लागले. भारतानं पहिल्या १० षटकांत ५ बाद ३९ धावा केल्या. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील टीम इंडियाची ही निचांक कामगिरी आहे. यापूर्वी २०१६साली न्यूझीलंडविरुद्ध नागपूर सामन्यात भारताचे ६ फलंदाज ४२ धावांवर माघारी परतले होते, तर २००८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४३ धावांत ५ विकेट्स पडल्या होत्या. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमार ( १६) व कुलदीप यादव ( २३*) यांनी सर्वाधिक धावा केल्या. भारताला ८ बाद ८१ धावांवर समाधान मानावे लागले. दासून शनाकाने २, चमिरा, मेंडीस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. Ind vs SL 2021, Ind vs SL 2021 3rd T20I, Ind vs SL 2021 Live Score
माफक लक्ष्य डोळ्यासमोर असताना श्रीलंकेच्या फलंदाजांनी कोणतीच घाई न करण्याचा निर्धार केलेला दिसला. अविष्का फर्नांडो व मिनोद भानुका यांनी अत्यंत सावध खेळ केला, परंतु राहुल चहरनं त्याच्या पहिल्याच षटकात विकेट घेतली. फर्नांडोला ( १२) चहरनं स्वतःच्याच गोलंदाजीवर बाद केले. पुढच्या षटकात चहरनं दुसरा सलामीवीर मिनोदला १८ धावांवर पायचीत पकडले. १२व्या षटकात चहरला आणखी एक यश मिळाले, सदीरा समरविक्रमा ( ६) त्रिफळाचीत झाला. चहरनं ४ षटकांत १५ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
पण, टीम इंडियाच्या धावाच एवढ्या कमी होत्या की त्यांचा बचाव करणे जवळपास अशक्यच होते. धनंजया डी सिल्व्हानं आक्रमक खेळ करताना श्रीलंकेचा विजय निश्चित केला. धनंजया २३ व हसरंगा १४ धावांवर नाबाद राहिले. श्रीलंकेनं ७ विकेट्स व ३३ चेंडू राखून विजय मिळवला. भारताची सलग ८ ट्वेंटी-२० मालिका जिंकण्याची मालिका खंडीत झाली. India's streak of winning 8 consecutive T20i series comes to an end tonight.