India vs Sri Lanka 3rd T20I : श्रीलंकेनं ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या लढतीत टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव पत्करण्यास भाग पाडले. या विजयासह श्रीलंकेनं तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. टीम इंडियाचे ८२ धावांचे माफक लक्ष्य श्रीलंकेनं १४.३ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. या सामन्यात ९ धावांत ४ विकेट्स घेणाऱ्या वनिंदू हसरंगाला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आला. हा सामना श्रीलंकेनं जिंकला असला तरी टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन यानं सर्वांची मनं जिंकली... Ind vs SL 2021, Ind vs SL 2021 3rd T20I, Ind vs SL 2021 Live Score
टीम इंडियाची अवस्था पाहून नेटिझन्स कृणाल पांड्यावर खवळले, भन्नाट मीम्स व्हायरल होऊ लागले!
कुलदीप यादव ( नाबाद २३), भुवनेश्वर कुमार ( १६) आणि ऋतुराज गायकवाड ( १४) यांच्या छोटेखानी खेळीमुळे टीम इंडियानं २० षटकांत ८ बाद ८१ धावा केल्या. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील टीम इंडियाची ही तिसरी निचांक कामगिरी ठरली. २००८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाला ७४ धावा करता आल्या होत्या, त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध २०१६साली टीम इंडियानं ७९ धावा केल्या होत्या. वनिंदू हसरंगानं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. दासून शनाकाने २, चमिरा, मेंडीस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. Ind vs SL 2021, Ind vs SL 2021 3rd T20I, Ind vs SL 2021 Live Score
माफक लक्ष्य डोळ्यासमोर असताना श्रीलंकेच्या फलंदाजांनी कोणतीच घाई न करण्याचा निर्धार केलेला दिसला. अविष्का फर्नांडो व मिनोद भानुका यांनी अत्यंत सावध खेळ केला, परंतु राहुल चहरनं त्यांना तीन धक्के दिलेच. चहरनं ४ षटकांत १५ धावांत ३ विकेट्स घेतल्या. श्रीलंकेकडून धनंजया डी सिल्व्हानं नाबाद २३, मिनोद भानुकानं १८, वनिंदु हसरंगानं नाबाद १४ आणि अविष्का फर्नांडो यानं १२ धावा केल्या. श्रीलंकेनं ७ विकेट्स व ३३ चेंडू राखून विजय मिळवला. Ind vs SL 2021 Live Updates, IND Vs SL 2021
या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार शिखऱ धवन यानं श्रीलंकेच्या युवा खेळाडूंसोबत त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अनुभव शेअर केला. त्यांना मार्गदर्शन केले. धवन म्हणाला,''ही खूप आव्हानात्मक परिस्थिती होती, परंतु संघ म्हणून आम्ही येथेच थांबून मालिका खेळण्याचा निर्णय घेतला. कर्णधार म्हणून मला बरेच काही शिकायला मिळाले. श्रीलंकेच्या खेळाडूंना माझा अनुभव जाणून घ्यायचा होता आणि आशा करतो की त्यांना मी केलेलं मार्गदर्शन आवडलं असेल. श्रीलंका संघाचे अभिनंदन.'' IND VS SL Live 3rd T20I, IND vs SL 3rd T20I Live
Web Title: India vs SL 3rd T20I live : Indian captain Dhawan talking to Sri Lankan youngsters after the series and sharing the experience
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.