भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात पावसानं व्यत्यय आणला आहे. हा सामना दुपारी १.३० सुरू होणार होता, पण पावसानं अजूनही विश्रांती घेतलेली नाही. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे नाणेफेकही झालेली नाही. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास सामना रद्द होऊ शकतो. पण, क्रिकेट चाहत्यांना अजूनही सामना होईल अशी अपेक्षा आहे. त्यासाठी त्यांनी पाऊस थांबण्याची प्रतीक्षा पाहावी लागेल.
कोरोना, पावसाचा तिकीट विक्रीला फटकाकोरोना व्हायरस व खराब हवामानामुळे या सामन्याच्या तिकीट विक्रीला चांगलाच फटका बसला. हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या माहितीनुसार मंगळवारपर्यंत २२ हजारांपैकी १६ हजार तिकीटांची विक्री झाली. येथे आंतरराष्ट्रीय सामना असला की तिकिटांची मोठी मागणी असते, मात्र यंदा कोरोनाची धास्ती आहे. दरवेळी किमान एक हजार विदेशी पर्यटक सामना पाहायचे. यंदा मात्र तसे दिसत नाही. याशिवाय पंजाब, हरियाणा आणि दिल्लीहून क्रिकेट चाहते यायचे. यावेळी मात्र असे चित्र दिसत नाही.
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, नवदीप सैनी आणि कुलदीप यादव.
दक्षिण आफ्रीका : क्विंटन डिकॉक (कर्णधार), तेम्बा बावुमा, रेसी वान डेर डुसेन, फाफ डुप्लेसिस, कोली वेरीने, हेन्रिक क्लासेन, जेनमॅन मलान, डेव्हिड मिलर, जॉन-जॉन स्मट्स, एन्डिले फेहलुकवायो, लुंगी एनगिडी, लूथो सिपामला, एन्रिक नोर्टजे, ब्युरोन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे आणि केशव महाराज.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020चं भवितव्य अधांतरी; शनिवारी बोलावली तातडीची बैठक
Coronavirus: केंद्र सरकारच्या 'त्या' एका निर्णयाने IPL 2020 मोठा फटका
मोठा निर्णय, सचिन-वीरूची फलंदाजी प्रत्यक्ष पाहता येणार नाही!
शारजात पुन्हा टीम इंडियाचं वादळ घोंगावलं, कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला लोळवलं
OMG : आंतरराष्ट्रीय खेळाडूला Corona Virusची लागण, संपूर्ण लीग करावी लागली रद्द
BCCI ची कोंडी; IPL 2020 चा निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची डेडलाईन