छा गये गुरू! अर्शदीप सिंगच्या २ चेंडूंत २ विकेट्स; दक्षिण आफ्रिकेची झाली बेक्कार अवस्था 

India vs South Africa 1st ODI Live Update : वर्ल्ड कपनंतर पहिलीच वन ड मॅच खेळण्यासाठी भारतीय संघ लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली आज मैदानावर उतरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 01:51 PM2023-12-17T13:51:02+5:302023-12-17T13:51:24+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa 1st ODI Live Update : 2 wickets in 2 balls for Arshdeep Singh, take Reeza Hendricks & Rassie van der Dussen wickets, video  | छा गये गुरू! अर्शदीप सिंगच्या २ चेंडूंत २ विकेट्स; दक्षिण आफ्रिकेची झाली बेक्कार अवस्था 

छा गये गुरू! अर्शदीप सिंगच्या २ चेंडूंत २ विकेट्स; दक्षिण आफ्रिकेची झाली बेक्कार अवस्था 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 1st ODI Live Update : वर्ल्ड कपनंतर पहिलीच वन ड मॅच खेळण्यासाठी भारतीय संघ लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली आज मैदानावर उतरला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून साई सुदर्शनला आज पदार्पणाची संधी दिली गेली आणि यजमानांकडून नांद्रे बर्गर आज पदार्पण करतोय. भारताचा गोलंदाज अर्शदीप सिंगने त्याच्या पहिल्याच षटकात यजमानांना दोन धक्के दिले. 


मुकेश कुमारच्या पहिल्याच चेंडूवर रिझा हेंड्रिक्स पायचीत झाला असता, परंतु खेळाडूंमध्ये कन्फ्युजन असल्याने DRS घेतला गेला नाही. हेंड्रिक्सला तिथे जीवदान मिळाले, कारण चेंडूचा पॅडला स्पर्श होण्यापूर्वी बॅटशी संपर्क झाला नव्हता. पण, अर्शदीप सिंगने दुसऱ्याच षटकात हेंड्रिक्सला ( ३) माघारी पाठवले. हेंड्रिक्सच्या बॅटची कड घेत चेंडू यष्टींवर जाऊन आदळला. अर्शदीपने पुढच्याच चेंडूवर रॅसी व्हॅन डेर ड्युसेनला ( ०) पायचीत करून माघारी पाठवले. 


 
भारत - लोकेश राहुल, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार


दक्षिण आफ्रिका - रिझा हेंड्रिक्स, टॉनी डी झॉर्झी, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्करम, हेनरिच क्लासेन, डेव्हिड मिलर, वियान मल्डर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर, तब्रेझ शम्सी.  

Web Title: India vs South Africa 1st ODI Live Update : 2 wickets in 2 balls for Arshdeep Singh, take Reeza Hendricks & Rassie van der Dussen wickets, video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.