भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या वन डे मालिकेतील पहिला सामना गुरुवारी धरमशाला येथे होणार आहे. Corona Virus चे संकट असताना त्यात आणखी एका संकटाची भर पडली आहे. त्यामुळे पहिला वन डे सामना रद्द होण्याची शक्यता बळावली आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर सपाटून मार खावून मायदेशी परतलेला भारतीय संघ घरच्या मैदानावर मर्दुमकी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, त्यांची ही संधी हिरावण्याची शक्यता आहे.
शिखर, हार्दिक, भुवनेश्वर परतणार; असे असणार टीम इंडियाचे अंतिम ११ शिलेदार!
या मालिकेतून हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन टीम इंडियात पुनरागमन करणार आहेत. या मालिकेसाठी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली जाईल, अशी शक्यता होती. पण, संघ व्यवस्थापनाने त्याला संघात कायम राखले आहे. रोहितच्या अनुपस्थितीत शिखर धवनसह सलामीसाठी पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल हे दोन पर्याय आहेत. न्यूझीलंड दौऱ्यात पृथ्वी आणि मयांक अग्रवाल यांनी ओपनिंग केली होती. पृथ्वीला साजेशी कामगिरी करता आली नाही. पण, तरीही आफ्रिकेविरुद्ध धवन आणि पृथ्वी ही जोडी सलामीला येईल.
मधल्या फळीत
विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल आणि मनीष पांडे हे पर्याय आहेत. कर्णधार म्हणून विराटचे स्थान पक्के आहे आणि लोकेशचा फॉर्म पाहता त्याला बाहेर बसवण्याची शक्यता फार कमी आहे. श्रेयसची न्यूझीलंड दौऱ्यातील कामगिरी पाहता त्याचेच पारडे जड मानले जात आहे. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा असे दोन अष्टपैलू पर्याय संघासमोर आहेत. हार्दिकने नुकत्याच झालेल्या ट्वेंटी-20 स्पर्धेत तुफानी फटकेबाजी करून दमदार पुनरागमनाचे संकेत दिले.
रवींद्र जडेजालाही या सामन्यात संधी मिळू शकते. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजीला धार मिळेल. जडेजा गोलंदाजीतही चांगली कामगिरी करत आहे. भारतीय संघ या सामन्यात दोन फिरकीपटूंसह उतरू शकतो. जडेजाला साथ म्हणून युजवेंद्र चहलचा समावेश निश्चित आहे. जलदगती गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी आणि जसप्रीत बुमराह यांच्या खांद्यावर असेल.
सामन्याच्या पूर्वसंध्येला धरमशाला येथे पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे गुरुवारी हा सामना होणार की नाही, हे पावसावर अवलंबून आहे. गुरुवारी पाऊस पडण्याची शक्यता ९० टक्के आहे. गुरुवारी सायंकाळी येथील तापमान २-३ डिग्री सेल्सिअस असण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. त्यात धो धो पाऊसही पडू शकतो. गतवर्षी उभय संघ धरमशाला येथे ट्वेंटी-२० सामन्यात भिडले होते आणि तोही सामना एकही चेंडू न टाकता रद्द झाला होता.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Corona वगैरे विसरा... क्रिकेट अन् आयपीएलचा आनंद लुटा... BCCI ची तिजोरी भरा!
सचिन तेंडुलकर पहिल्याच षटकात माघारी, पण इरफानची फटकेबाजी लै भारी!
IPL रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
भारत-पाकिस्तान भांडणामुळे ICCसमोर पेच; वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केले, पण...
विराट कोहलीचे Social Account बंद करण्याच्या याचिकेला तुफान प्रतिसाद; कारण ऐकून बसेल धक्का
Corona Virusची टीम इंडियाच्या खेळाडूंना धास्ती; महत्त्वपूर्ण निर्णय
Web Title: India vs South Africa, 1st ODI : Rain Likely To Play Spoilsport In Series Opener svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.