IND vs SA 1st ODI: भारताची आजपासून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वन डे मालिका सुरू होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज पार्ल येथे खेळला जाणार आहे. कसोटी मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्याची भारताकडे उत्तम संधी आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडू जोरदार तयारी करत आहेत. १८ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला असला तरी अंतिम ११ खेळाडूंमध्ये कोण जागा पटकावणार याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. तशातच भारताच्या दोन माजी मुंबईकर क्रिकेटपटूंनी आपापल्या पसंतीचा संघ जाहीर केला आहे.
भारताचा रणजी किंग वासिम जाफर याने आपल्या ट्वीटरवर त्याच्या पसंतीचा संघ जाहीर केला. या संघात त्याने सलामीवीर म्हणून राहुल आणि शिखर धवनला संधी दिली. मधल्या फळीत विराट, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतला समाविष्ट केलं आहे. तर सहाव्या क्रमांकासाठी त्याने सूर्यकुमार यादवला संघात घेतलं आहे. व्यंकटेश अय्यरला त्याने संघात स्थान दिलेले नाही. अष्टपैलू खेळाडू म्हणून अश्विन आणि शार्दूल दोघांनाही संघात घेण्यात आले आहे. तर गोलंदाजीची जबाबदारी भुवनेश्वर कुमार किंवा सिराज, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह या तिघांना देण्यात आली आहे.
वसीम जाफरच्या पसंतीचे Playing XI - केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार / मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार)
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि लोकप्रिय समालोचक संजय मांजरेकर यांनीही आपल्या पसंतीचा संघ निवडला आहे. त्यांनी मात्र आपल्या संघात अनुभवी शिखर धवनला संधी दिली नाहीये. राहुलबरोबर सलमीला व्यंकटेश अय्यरने यावं असं त्यांचं मत आहे. मधल्या फळीत विराट, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी जयंत यादवला संघ स्थान दिले आहे. तर गोलंदाजीची जबाबदारी शार्दूल ठाकूर, दीपक चहर, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
संजय मांजरेकरांच्या पसंतीचे Playing XI - केएल राहुल (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, जयंत यादव, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह (VC).
Web Title: India vs South Africa 1st ODI Team India Playing XI Predictions Wasim Jaffer axe Venkatesh Iyer Sanjay Manjrekar removes Shikhar Dhawan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.