India vs South Africa 1st T20, India Playing 11: भारतीय क्रिकेट संघ ४ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ८ नोव्हेंबरपासून टी-२० मालिकेच्या मोहिमेला सुरुवात करेल. दोन्ही संघातील पहिला सामना टी-२० सामना डरबनच्या किंग्समीड स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात रंगणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात कुणाला संधी मिळणार ते पाहण्याजोगे असेल. एक नजर संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर...
अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन जोडीच करेल भारतीय संघाच्या डावाची सुरुवात
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. गत टी-२० मालिकेचा सेम पॅटर्नसह भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धही मैदानात उतरले. याचा अर्थ अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही जोडी भारतीय संघाच्या डावाला सुरुवात करेल. बांगलादेश विरुद्धच्या टी-२० मालिकेत संजूचा जलवा पाहायला मिळाला होता. दुसरीकडे अभिषेक यावेळी अभिषेक शर्मा आपल्या स्फोटक खेळीतील नजराणा दाखवून देण्यासाठी प्रयत्नशील असेल. याआधीच्या मालिकेत त्याला सर्वोत्तम खेळ करता आला नव्हता.
तिलक वर्माचं कमबॅक पक्के
तिसऱ्या क्रमांकावर युवा तिलक वर्माला संधी मिळू शकते. तो मोठ्या कालावधीनंतर टीम इंडियात कमबॅक करत आहे. सूर्या अन् तिलक वर्मा दोघे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात. दोघांनाही MI नं रिटेनही केलं आहे. आयपीएलआधी ही जोडी देशाकडून एकमेकांसोबत खेळताना दिसेल. तिलक वर्मानंतर चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव बॅटिंगला येईल.
६ गोलंदाजी पर्याय असू शकते टीम इंडियाची पहिली पसंती
पाचव्या क्रमांकावर ऑल राउंडर हार्दिक पांड्या आणि सहाव्या क्रमांकावर रिंकू सिंह खेळताना दिसेल. दोघांनावर जलदगतीने धावा करण्याची जबाबदारी असेल. या दोघानंतर अक्षर पटेलचा नंबर लागण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्यामुळे गोलंदाजीत फक्त दोनच जलदगती गोलंदाजांनी संधी मिळेल. यात अर्शदीप आणि आवेश खानयांचा समावेश असेल. रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती हे मुख्य फिरकीपटूच्या रुपात संघात दिसू शकतील.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ :
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.