धर्मशाला, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना रद्द केला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.पण सामना रद्द करण्याचा निर्णय किती मिनिटांमध्ये घेण्यात आला, हे तुम्हाला माहिती आहे का...
सामन्याचा जेवढा कालावधी असतो त्यापेक्षा अर्ध्यापेक्षा जास्तवेळ वाया गेला तर सामना रद्द केला जातो. पण धर्मशाला येथील सामन्यामध्ये तसे पाहायला मिळाले नाही. हा सामना अन्य लढतींपेक्षा लवकर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण हा निर्णय एवढ्या लवकर का घेण्यात आला, ते जाणून घ्या...
धर्मशाला येथे गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडत होता. त्याचबरोबर आज दुपारपासून जोरदार पाऊस सुरु आहे. पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. मैदान पूर्णपणे निसरडे झाले होते आणि पाऊस थांबला नसल्यामुळे मैदानातील संपूर्ण पाणी बाहेर काढणे शक्य नव्हते. त्यामुळे सामन्यानंतर फक्त 50 मिनिटांमध्ये ही लढत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जोरदार पावसामुळे पहिला सामना रद्द
जोरदार पावसामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला ट्वेन्टी-20 सामना रद्द करण्यात आला आहे. धर्मशाला येथे दुपारी चार वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरु झाला. त्यानंतर सतत पाऊस पडत असल्यामुळे मैदानातील संपूर्ण पाणी बाहेर काढता येत नव्हते. पंचांनी मैदानाच्या परिस्थितीची पाहणी केली आणि अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाऊस पडल्यावर किती वेळात सुरु होऊ शकतो सामना, जाणन घ्या...
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना धर्मशाला येथे होणार आहे. पण काही मिनिटांपूर्वीच इथे पाऊस पडला आहे. पण पाऊस पडल्यावर किती वेळात सामना सुरु होऊ शकतो. या गोष्टीचे स्पष्टीकरण येथील क्युरेटर सुनील चौहान यांनी दिले आहे.
आज दुपारी चार वाजता येथे पाऊस पडला. पण त्यानंतर सामना सुरु व्हायला तीन तास होते. पण जर सामना सुरु होण्याच्या काही मिनिटांपूर्वी पाऊस पडला किंवा सामना सुरु असताना पाऊस पडला तर किती मिनिटांमध्ये सामना पुन्हा सुररु होऊ शकतो, याबाबत चौहान यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
याबाबत चौहान म्हणाले की, " गेल्या तीन दिवसांपासून सतत इथे पाऊस पडत आहे. पण सामना खेळवण्यासाठी आम्ही सर्वतोपर प्रयत्न करत आहोत. आम्ही जवळपास सर्व मैदान झाकले आहे. पण मैदानाचा काही भाग झाकायचा राहिला आहे. जर पाऊस थांबला तर त्या भागातील पाणी आम्ही सुपर सोपरने काढू. त्यामुळे पाऊस थांबल्यावर अर्ध्या तासामध्ये आम्ही सामना पुन्हा सुरु करू शकतो."
काही मिनिटांपूर्वी पडला पाऊस, सामना होणार की नाही ते जाणून घ्या...
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना धर्मशाला येथे काही तासांमध्ये सुरु होणार आहे. पण काही मिनिटांपूर्वीच धर्मशाला येथे पाऊस पडला आहे. त्यामुळे हा सामना खेळवायचा की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
धर्मशाला येथे गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे येथील वातावरण थंड झाले आहे. त्याचबरोबर सतत पाऊस पडत असल्यामुळे वातावरण वेगवान गोलंदाजांसाठी पोषक ठरू शकते. त्यामुळे जो संघ नाणेफेक जिंकेल तो पहिल्यांदा गोलंदाजी स्वीकारेल, असे म्हटले जात आहे.
Web Title: India vs South Africa, 1st T20I: in How many minutes the match was canceled...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.