India vs South Africa, 1st Test: शतकानंतर रोहित शर्माची सोशल मीडियावर बल्ले-बल्ले

योगायोग म्हणजे ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये प्रथम ओपनर म्हणून रोहितनं आफ्रिकेविरुद्धच शतक झळकावले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 08:55 PM2019-10-02T20:55:50+5:302019-10-02T20:56:49+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa, 1st Test: A century after Rohit Sharma get good wishes social media | India vs South Africa, 1st Test: शतकानंतर रोहित शर्माची सोशल मीडियावर बल्ले-बल्ले

India vs South Africa, 1st Test: शतकानंतर रोहित शर्माची सोशल मीडियावर बल्ले-बल्ले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : कसोटीत प्रथमच सलामीला आलेल्या रोहित शर्माचा खेळ कसा होतो, याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. रोहितनं सुरुवातीला संयमी आणि जम बसल्यावर आपल्या नेहमीच्या अंदाजात खेळ करताना चाहत्यांना खुश केलं. एक सलामीवीर म्हणून रोहितचे हे कसोटी क्रिकेटमधील पहिलेच शतक ठरले. या शतकानंतर सोशल मीडियावर रोहितची बल्ले-बल्ले पाहायला मिळाली.

रोहितने 165 चेंडूंत 11 व 4 षटकार खेचून शतक पूर्ण केले. कसोटीतील त्याचे हे चौथे शतक ठरलं, तर सलामीवीर म्हणून त्याचे हे पहिलेच शतक आहे. योगायोग म्हणजे ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये प्रथम ओपनर म्हणून रोहितनं आफ्रिकेविरुद्धच शतक झळकावले होते. कसोटीत सलामीवीर म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चौथा भारतीय आहे.


आयसीसीने म्हटले आहे की, "हिटमॅन रोहित शर्मामे दमदार पुनरागमन केले आहे. रोहितचे हे सलामीवीर म्हणून पहिलेच शतक आहे."

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग म्हणाला की, " कोणत्याही प्रकारचे क्रिकेट असो, रोहित शर्मा हिट आहे. "


भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने म्हटले आहे की, " रोहितने मिळालेल्या संधीचे चांगलेच सोने केले आहे. रोहित पहिल्यांदा सलामीली आला आणि त्याने शतक झळकावले."

तब्बल दोन वर्ष वाट पाहणाऱ्या रोहित शर्माने सांगितली 'मन की बात'
आजचा दिवस हा रोहित शर्माचाच होता. पहिल्यांदा रोहित सलामीला आला आणि त्याने शतकाला गवसणी घातली. विक्रमही त्याने रचले. पण तब्बल दोन वर्ष रोहित कसोटी शतकाच्या प्रतिक्षेत होता. पण आता दोन वर्षांनी ही गोष्ट घडल्यावर रोहितने आपले मन मोकळे केले आहे. सामन्यानंतर आपली 'मन की बात' सांगितली आहे.

 रोहितनं 165 चेंडूंत 11 व 4 षटकार खेचून शतक पूर्ण केले. कसोटीतील त्याचे हे चौथे शतक ठरलं, तर सलामीवीर म्हणून त्याचे हे पहिलेच शतक आहे. योगायोग म्हणजे ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये प्रथम ओपनर म्हणून रोहितनं आफ्रिकेविरुद्धच शतक झळकावले होते. कसोटीत सलामीवीर म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चौथा भारतीय आहे. यापूर्वी शिखर धवनने 2012-13मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली कसोटीत 187 धावांची खेळी केली होती. लोकेश राहुलने 2015मध्ये सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 110 धावा केल्या होत्या, तर पृथ्वी शॉ याने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 134 धावा केल्या आहेत.
रोहित म्हणाला की, " गेल्या दोन वर्षांपासून मी या गोष्टीची वाट पाहत होतो. अखेर दोन वर्षांनी हा योग जुळून आला. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यामध्ये असताना मला सलामीला खेळायला मिळणार, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आता जेव्हा मला ही संधी मिळाली तेव्हा या गोष्टीचा फायदा उचलण्याचे मी ठरवले होते. आजचा खेळही चांगला झाला. त्यामुळे आता यापुढे किती धावा वाढवता येतील, यावर आमचे लक्ष केंद्रीत असेल."
रोहितनं कसोटी क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून सॉलिड सुरुवात करताना दी वॉल राहुल द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी केली. 1998मध्ये द्रविडनं केलेल्या विक्रमाची रोहितनं पुनरावृत्ती केली. येथेच तो थांबला नाही. त्यानं कसोटीत सलामीला येण्याच्या संधीचं सोनं करताना खणखणीत शतकही झळकावलं. रोहितनं घरच्या मैदानावर कसोटीत सलग सहावेळा 50+ धावा केल्या आहेत. त्यानं मागील सहा डावांत 82, 51*, 102*, 65, 50*, 59*( आजची खेळी) पन्नासपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या कामगिरीसह त्यानं राहुल द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी केली. द्रविडनं 1997-98 या कालावधीत मायदेशात सलग सहावेळा 50+ धावा केल्या होत्या. या अर्धशतकामुळे रोहितचा आत्मविश्वास आणखी वाढला आणि त्यानं त्याचं शतकात रुपांतर केले. 

Web Title: India vs South Africa, 1st Test: A century after Rohit Sharma get good wishes social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.