Join us  

India vs South Africa, 1st Test : रोहित-मयांक जोडीला पहिला मान, आफ्रिकेविरुद्ध सांभाळली कमान

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मयांक अग्रवालने शतकी खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 10:48 AM

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मयांक अग्रवालने शतकी खेळी केली. त्यानं 209 चेंडूंचा सामना करताना 13 चौकार व 2 षटकारांच्या मदतीनं पहिल्या शतकाची नोंद केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला. यासह मयांक आणि रोहित या जोडीनं 240+ धावांची सलामी देत 15 वर्षांपूर्वीचा वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर यांचा विक्रम मोडला. शिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोणत्याही भारतीय सलामीवीरांना न जमलेला पराक्रम रोहित-मयांकने करून दाखवला. 

मयांक - रोहितनं विक्रम रचला, सेहवाग-गंभीरचा 15 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ 59.1 षटकांत बिनबाद 202 धावांवर थांबवण्यात आला. रोहित शर्माने प्रथमच कसोटीत सलामीला येताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मयांकच्या शतकाची सर्वांना उत्सुकता लागली होती. त्यानं झटपट शतक झळकावे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावण्याचा मान मयांकने पटकावला. यापूर्वी प्रवीण आम्रे ( 1992), राहुल द्रविड ( 1997) आणि वीरेंद्र सेहवाग ( 2001) यांनी आफ्रिकेविरुद्ध कसोटीतील पहिले शतक झळकावले होते. कसोटीत शतक झळकावणारा मयांक हा 86वा भारतीय खेळाडू ठरला आहे. तर भारताकडून हे 510वे शतक आहे. 

दुसरी धाव अन् रोहित-मयांकने मोडला 83 वर्षांपूर्वीचा विक्रम

आतापर्यंत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्याच सलामीवीरांना एका डावात शतकी खेळी करता आली होती. त्यांच्या पंक्तीत रोहित-मयांकने स्थान पटकावले. आफ्रिकेविरुद्ध कसोटीच्या एकाच डावात शतक झळकावणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली आहे. 

मयांक-रोहितची जोडी जमली; सलामीवीर म्हणून रचला इतिहास

रोहित कसोटीत घरच्या मैदानावर कोहलीपेक्षा बेस्ट? आकडेवारी पाहा अन् ठरवा

वीरू, गब्बरला जे नाही जमलं ते हिटमॅनने करून दाखवलं

तब्बल दोन वर्ष वाट पाहणाऱ्या रोहित शर्माने सांगितली 'मन की बात'

हिटमॅन रोहितची सॉलिड सुरुवात, 'दी वॉल'च्या विक्रमाशी बरोबरी

रोहित ठरला 'हिट'; पहिल्याच सामन्यात शतक झळकावणारा चौथा ओपनर

रोहित शर्माची सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी; पाहा आकडेवारी

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्मामयांक अग्रवाल