Join us  

IND vs SA Live: किंग कोहलीचा 'विराट' संघर्ष! पण भारतावर दारूण पराभवाची नामुष्की, 'कसोटी' कायम

India Vs South Africa 1st Test Live Updates In Marathi : भारताला सलामीच्या कसोटी सामन्यात दारूण पराभवाचा सामना करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 8:37 PM

Open in App

India Vs South Africa 1st Test | सेंच्युरियन : भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर नेहमीच कमजोर दिसला आहे. यंदा देखील याचा प्रत्यय पाहायला मिळाला. मंगळवारपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या सामन्याला सुरूवात झाली. पण, भारतीय फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे टीम इंडियाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या डावात लोकेश राहुल (१०१) वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. तर दुसऱ्या डावात विराट कोहलीने भारतीय चाहत्यांच्या आशा जिवंत ठेवताना (७६) धावा केल्या. पण, 'विराट' खेळी सुरू असताना दुसरीकडे भारताच्या एकाही खेळाडूला फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. यजमानांनी १६३ धावांची आघाडी घेतल्यावर भारतीय संघावर दबाव वाढला होता. विराट कोहलीने अखेरपर्यंत संघर्ष केला पण टीम इंडियाला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात अवघ्या ३४.१ षटकांत १३१ धावांवर सर्वबाद झाला. 

पहिल्या डावात भारतीय कर्णधार रोहित शर्माला (५) काही खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या डावात रोहित चमकदार कामगिरी करून सामन्यात संघाचे पुनरागमन करेल अशी आशा भारतीय चाहत्यांना होती. मात्र, पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावात देखील भारतीय कर्णधार स्वस्तात बाद झाला. कगिसो रबाडा रोहितसाठी काळ ठरला अन् त्याने अप्रतिम चेंडू टाकून हिटमॅनचा त्रिफळा काढला. रोहितपाठोपाठ यशस्वी जैस्वाल (५) देखील तंबूत परतला. त्यानंतर जणू काही विकेटांची मालिकाच सुरू झाली. भारताकडून शुबमन गिल (२६), श्रेयस अय्यर (६), लोकेश राहुल (४), आर अश्विन (०), शार्दुल ठाकूर (२), जसप्रीत बुमराह (०), मोहम्मद सिराज (४) आणि विराट कोहलीने (७६) धावांचे योगदान दिले. 

दरम्यान,  दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने ६६ षटकांत ५ गडी गमावून २५६ धावा केल्या होत्या. अशा प्रकारे यजमान संघाकडे ११ धावांची आघाडी घेतली होती. मात्र, आज तिसऱ्या दिवशी यजमान संघाने स्फोटक खेळी करत ४०० पार धावसंख्या नेली. आफ्रिकेने १०८.४ षटकांत सर्वबाद ४०८ धावा केल्या आणि यासह यजमानांनी १६३ धावांची आघाडी घेतली. टीम इंडियाचा पहिला डाव ६७.४ षटकांत २४५ धावांवर संपला. टीम इंडियाकडून लोकेश राहुलने सर्वाधिक १०१ धावांची खेळी खेळली. तर, दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ५ बळी घेतले.

भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो सामन्याच्या पहिल्याच दिवशी कगिसो रबाडाने भारताच्या आशेवर पाणी टाकले. पहिल्या दिवसअखेर भारताने ८ गडी गमावून २०८ धावा केल्या होत्या. भारताने केवळ १२१ धावांत सहा गडी गमावले. लोकेश राहुल ७० धावांवर नाबाद खेळत होता. तर, शार्दुल ठाकूर (२४), जसप्रीत बुमराह (१), आर अश्विन (८), श्रेयस अय्यर (३१), विराट कोहली (३८), शुबमन गिल (२), रोहित शर्मा (५) आणि यशस्वी जैस्वाल (१७) धावा करून तंबूत परतला होता. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक पाच बळी घेतले होते. पण, दुसऱ्या दिवशी राहुलने १०१ धावांची शतकी खेळी करून भारताचा डाव सावरला. १२१ धावांत सहा गडी गमावल्यानंतर टीम इंडियाला तिथून १५० धावा करणे कठीण झाले होते. मात्र, मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या राहुलने सावध खेळी आणि भारताने आपल्या पहिल्या डावात ६७.४ षटकांत सर्वबाद २४५ धावा केल्या. दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने ६६ षटकांत ५ गडी गमावून २५६ धावा केल्या होत्या. अशा प्रकारे यजमान संघाकडे ११ धावांची आघाडी घेतली होती. मात्र, आज यजमान संघाने स्फोटक खेळी करत ४०० पार धावसंख्या नेली. आफ्रिकेने १०८.४ षटकांत सर्वबाद ४०८ धावा केल्या आणि यासह यजमानांनी १६३ धावांची आघाडी घेतली. टीम इंडियाचा पहिला डाव ६७.४ षटकांत २४५ धावांवर संपला. 

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

पहिल्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ - टेम्बा बावुमा (कर्णधार), डीन एल्गर, एडन मार्करम, टोनी डी जिओर्गी, कीगन पीटरसन, डेव्हिड बॅडिंगहॅम, काइल वॉरेन (यष्टीरक्षक), मार्को जान्सेन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.

 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघविराट कोहलीरोहित शर्मा