India Vs South Africa 1st Test Live Updates | सेंच्युरियन: भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माच्या रूपात पाहुण्या संघाला मोठा झटका बसला. कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात असलेला रोहित फसला अन् पाच धावा करून बाद झाला. भारताची धावसंख्या १३ असताना रोहित शर्मा बाद झाला. भारतीय कर्णधाराला स्वस्तात माघारी पाठवून यजमान संघाने मजबूत सुरूवात केली. कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर रोहितने पुल शॉट खेळताना नांद्रे बर्गरच्या हातात सोपा झेल दिला.
दरम्यान, रोहित बाद झाल्यानंतर शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी सावध खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, चांगल्या लयनुसार खेळत असलेला जैस्वाल (१७) नांद्रे बर्गरचा शिकार झाला. यशस्वीने ३७ चेंडूत १७ धावा केल्या. गिल आणि विराट कोहली भारताचा डाव पुढे नेतील अशी आशा असताना यजमानांनी भारताला आणखी एक मोठा झटका देत गिलला बाहेरचा रस्ता दाखवला. पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या बर्गरने २ धावांवर असलेल्या गिलला तंबूत पाठवले.
पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
पहिल्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ - टेम्बा बावुमा (कर्णधार), डीन एल्गर, एडन मार्करम, टोनी डी जिओर्गी, कीगन पीटरसन, डेव्हिड बॅडिंगहॅम, काइल वॉरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सिन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.