India Vs South Africa 1st Test Live Updates | सेंच्युरियन: आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहे. पावसाच्या कारणास्तव नाणेफेकीला उशीर झाला. खराब हवामानामुळे सामन्यात व्यत्यय आला अन् उशीराने नाणेफेक झाली असून दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लक्षणीय बाब म्हणजे आतापर्यंत भारतीय संघाला एकदाही आफ्रिकेच्या धरतीवर मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाला इतिहास रचण्याची संधी असेल. भारताने ३२ वर्षात आठवेळा आफ्रिकेचा दौरा केला असून एकदाही टीम इंडियाला मालिका खिशात घालता आली नाही.
दरम्यान, आजच्या सामन्यातून प्रसिद्ध कृष्णा कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या जागी अनुभवी रवीचंद्रन अश्विनला संधी मिळाली आहे. भारतीय संघ चार वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूसह मैदानात उतरला आहे. यजमान संघाने प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य दिल्याने पाहुणा भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना दिसेल. जाणकारांच्या मते, प्रथम फलंदाजी करणे या खेळपट्टीवर ठीक असल्याने भारताला सुखद धक्का बसल्याचे दिसते.
पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
पहिल्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ - टेम्बा बावुमा (कर्णधार), डीन एल्गर, एडन मार्करम, टोनी डी जिओर्गी, कीगन पीटरसन, डेव्हिड बॅडिंगहॅम, काइल वॉरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सिन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.
कसोटी मालिकेसाठी भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, अभिमन्यू ईश्वरन, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.
मालिकेचे वेळापत्रक
- २६ ते ३० डिसेंबर - दुपारी १.३० वाजल्यापासून (सेंच्युरियन)
- ३ ते ७ जानेवारी - दुपारी १.३० वाजल्यापासून (केपटाउन)