भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मयांक अग्रवालने शतकी खेळी केली. त्यानं 209 चेंडूंचा सामना करताना 13 चौकार व 2 षटकारांच्या मदतीनं पहिल्या शतकाची नोंद केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला. यासह मयांक आणि रोहित या जोडीनं 240+ धावांची सलामी देत 15 वर्षांपूर्वीचा वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर यांचा विक्रम मोडला.
दुसरी धाव अन् रोहित-मयांकने मोडला 83 वर्षांपूर्वीचा विक्रम
पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ 59.1 षटकांत बिनबाद 202 धावांवर थांबवण्यात आला. रोहित शर्माने प्रथमच कसोटीत सलामीला येताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मयांकच्या शतकाची सर्वांना उत्सुकता लागली होती. त्यानं झटपट शतक झळकावे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावण्याचा मान मयांकने पटकावला. यापूर्वी प्रवीण आम्रे ( 1992), राहुल द्रविड ( 1997) आणि वीरेंद्र सेहवाग ( 2001) यांनी आफ्रिकेविरुद्ध कसोटीतील पहिले शतक झळकावले होते. कसोटीत शतक झळकावणारा मयांक हा 86वा भारतीय खेळाडू ठरला आहे. तर भारताकडून हे 510वे शतक आहे.
मयांक-रोहितची जोडी जमली; सलामीवीर म्हणून रचला इतिहास
रोहित कसोटीत घरच्या मैदानावर कोहलीपेक्षा बेस्ट? आकडेवारी पाहा अन् ठरवा
वीरू, गब्बरला जे नाही जमलं ते हिटमॅनने करून दाखवलं
मयांकच्या या खेळीनं रोहितच्या नावावरही एक विक्रम नोंदवला गेला. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 219 धावा करताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वोत्तम सलामीची भागीदारी करणाऱ्या जोडीचा मान पटकावला. गंभीर व सेहवाग जोडीनं 2004मध्ये आफ्रिकेविरुद्ध 218 धावांची सलामी दिली होती. 1972नंतर प्रथमच भारताचे दोन्ही फलंदाज प्रथमच घरच्या मैदानावर कसोटीत सलामीला आले आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेत सर्वोत्तम सलामीची भागीदारी करण्याचा मान मयांक-रोहित जोडीनं पटकावला. त्यांनी ए हडसन आणि गॅऱी कर्स्टन यांचा 236 धावांचा विक्रम मोडला.
तब्बल दोन वर्ष वाट पाहणाऱ्या रोहित शर्माने सांगितली 'मन की बात'
हिटमॅन रोहितची सॉलिड सुरुवात, 'दी वॉल'च्या विक्रमाशी बरोबरी
रोहित ठरला 'हिट'; पहिल्याच सामन्यात शतक झळकावणारा चौथा ओपनर
रोहित शर्माची सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी; पाहा आकडेवारी