भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्माच्या झंझावातानंतर मयांक अग्रवालची बॅट तळपली. त्यानं पाचव्या कसोटीत दमदार द्विशतकी खेळी केली. कसोटीतील पहिले शतक आणि त्याचे द्विशतकात रुपांतर करून मयांकने विक्रमी कामगिरी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने चारशे धावांचा पल्ला पार केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक झळकावणारा तो दुसरा आशियाई सलामीवीर ठरला आहे. वीरेंद्र सेहवागनं आफ्रिकेविरुद्ध द्विशतकी खेळी केली होती.
मयांकच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तीन 200+ धावांच्या खेळी जमा झाल्या आहेत. त्यानं 2017मध्ये कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्रविरुद्ध नाबाद 304 धावा केल्या होत्या. 2018मध्ये भारत A आणि दक्षिण आफ्रिका A या सामन्यायतही त्यानं 220 धावा केल्या. 2009नंतर कसोटीत सलामीवीरानं ठोकलेलं हे 19वे द्विशतक ठरलं. तसंच पहिल्या शतकाचं द्विशतकात रुपांतर करणारा तो 36वा खेळाडू ठरला आहे.
कसोटीत पहिलेच शतक झळकावून सर्वाधिक धावांच्या भारतीय फलंदाजाच्या विक्रमात मयांकने दीलीप सरदेसाई यांच्या विक्रमालाही मागे टाकले. सरदेसाई यांनी 1964/65 साली न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटीत नाबाद 200 धावा केल्या होत्या. मयांकने हा पल्ला ओलांडला. आता त्याला विनोद कांबळीचा ( 224 वि. इंग्लंड, 1992-93) विक्रम खुणावत आहे. या विक्रमात करूण नायर नाबाद 303 ( वि. इंग्लंड, 2016-17) आघाडीवर आहे.
आफ्रिकेविरुद्ध भारतीय सलामीवीराची सर्वोत्तम कामगिरीवीरेंद्र सेहवाग ( 319 धावा, चेन्नई 2008)मयांक अग्रवाल ( 215 धावा, विशाखापट्टणम, 2019)रोहित शर्मा ( 176 धावा, विशाखापट्टणम, 2019)