भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताकडून पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी डबल धमाका पाहायला मिळाला. भारताचा सलामीवीर मयांक अगरवालने द्विशतक झळकावले आणि दुसऱ्या दिवसावरही भारताचेच वर्चस्व पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवशी भारताने आपला पहिला डाव 7 बाद 502 धावांवर घोषित केला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला दिवसअखेर 3 बाद 39 अशी मजल मारता आली. आर अश्विन ( 2/9) आणि रवींद्र जडेजा ( 1/21) यांनी आफ्रिकेला धक्का देत त्यांची अवस्था 3 बाद 39 अशी केली. तिसऱ्या दिवशी इशांत शर्मानं आफ्रिकेच्या टेंबा बवूमाला पायचीत केले. पण, कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस आणि डीन एल्गर यांनी डाव सावरला.
फॅफला बाद करण्यासाठी कर्णधार विराट कोहीलनं फिरकीपटू जडेजाला पाचारण केलं. यावेळी जडेजानं एक असा चेंडू टाकला की त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. फॅफ समोर फलंदाजी करत असताना जडेजानं टाकलेला चेंडू एक, दोन, तीन, चार.... असे कितीतरी टप्पे घेत यष्टिरक्षकापर्यंत कसाबसा पोहोचला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ...
मयांकच्या द्विशतकी खेळीनं केलं बॉलिवूडच्या 'हॉट' अभिनेत्रीला बोल्ड, म्हणाली...भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्माच्या झंझावातानंतर मयांक अग्रवालची बॅट तळपली. त्यानं कारकिर्दीच्या पाचव्या कसोटीत दमदार द्विशतकी खेळी केली. कसोटीतील पहिले शतक आणि त्याचे द्विशतकात रुपांतर करून मयांकने विक्रमी कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक झळकावणारा तो दुसरा आशियाई सलामीवीर ठरला आहे. वीरेंद्र सेहवागनं आफ्रिकेविरुद्ध द्विशतकी खेळी केली होती. मयांकने 371 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकारांसह 215 धावा केल्या.
मयांकच्या या खेळीचे सर्व स्तरातून कौतुक झाले. त्यात बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सैयामी खेरचाही समावेश आहे. सैयामी नेहमीच क्रिकेट फॉलो करते. भारतीय संघाच्या प्रत्येक सामन्यावर तिचे लक्ष असते आणि सोशल मीडियावरील तिच्या ट्विटमधून ते दिसूनही येते. मयांकने झळकावलेल्या द्विशतकानंतर सैयानीनं ट्विट केलं. ती म्हणाली,''अथक परिश्रमातून मयांकचा इथवरचा प्रवास घडला आहे. निवड समितीनं राष्ट्रीय संघात संधी द्यावी यासाठी तो स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यानं धावा करत राहिला. अखेरीस त्याची दखल घ्यावी लागली. त्याचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.''