India vs South Africa 1st Test Live: भारतीय संघाने पहिल्या सत्रात दमदार सलामी दिल्यानंतर दुसऱ्या सत्रात मात्र भारताला दोन धक्के बसले. लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल या दोघांनी पहिल्या सत्रात ८३ धावांची भागीदारी करून संघाला भक्कम स्थितीत आणून ठेवले. दुसऱ्या सत्रातही दोघे चांगला खेळ करत होते. पण लुंगी एन्गीडीच्या एका षटकात सामन्यात ट्विस्ट आला. सामन्याच्या ४१व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर मयंक अग्रवाल पायचीत झाला. त्याने ६० धावांची संयमी खेळी केली. त्यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला पण अगदी पहिल्याच चेंडूवर तो झेलबाद होऊन माघारी परतला.
चेतेश्वर पुजारा गेल्या काही महिन्यांपासून अपेक्षित कामगिरी करत नाहीये. त्यामुळे भारतीय संघात आजच्या सामन्यासाठी त्याला वगळण्यात यावे अशी काही चाहत्यांची मागणी होती. पण भारताबाहेरचा पुजाराचा रेकॉर्ड खूप चांगला असल्याने त्याला संघात संधी मिळाली. या संधीचे सोनं करण्याची त्याच्याकडे आणखी एक संधी होती. पण त्याने पहिल्या डावात संधीची माती केली. पुजारा पुन्हा एकदा अयशस्वी ठरल्याने नेटकऱ्यांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला. पाहा त्याच्यावर टीका करणारे काही ट्वीट्स...
--
--
--
--
--
दरम्यान, भारतीय संघाने पहिल्या सत्रात अतिशय उत्तम सुरूवात केली. पहिल्या अर्ध्या तासात राहुलला एकदा पंचांना नाबाद ठरवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने DRS घेतला होता. पण त्यांचा रिव्ह्यू वाया गेला. त्यानंतर मयंक अग्रवालला २२ धावांवर असताना जीवनदान मिळाले. त्यानंतर त्याने संयमी खेळ केला. मयंकने शानदार अर्धशतक लगावले. लुंगी एन्गीडीने दोन बळी टिपल्यानंतर राहुलने विराट कोहलीच्या साथीने डाव सावरला आणि आपले अर्धशतक पूर्ण केले.
Web Title: India vs South Africa 1st test: Oh my God! Cheteshwar Pujara returns on the first ball; Good news for netizens, see tweets ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.