भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवल्यानंतर रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल या जोडीनं दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली. बिनबाद 202 धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात करताना या जोडीनं दुसरी धाव घेताच नव्या विक्रमाची नोंद केली. या जोडीनं 83 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आणि भारताकडून सलामीला सर्वोत्तम भागीदारी करणाऱ्या जोडींत अव्वल दहामध्ये स्थान पटकावले. रोहितने दिवसाच्या तिसऱ्याच चेंडूवर चौकार खेचून हा विक्रम केला.
कसोटीत प्रथमच सलामीला आलेल्या रोहितनं खणखणीत शतक झळकावून अनेक विक्रमांना गवसणी घातली, तर मयांकनेही त्याला तोडीसतोड साथ दिली. रोहित आणि मयांक प्रथमच सलामीवीर म्हणून कसोटीत एकत्र खेळले. या जोडीनं 59.1 षटकांत 202 धावांची भागीदारी करून इतिहास घडवला. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. रोहितने 174 चेंडूंत 12 चौकार व 5 षटकार खेचून 115 धावा केल्या, तर मयांकने 183 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकार खेचून 84 धावा केल्या आहेत. मयांकही कसोटीतील पहिले शतक झळकावण्यासाठी उत्सुक आहे.
मयांक-रोहितची जोडी जमली; सलामीवीर म्हणून रचला इतिहास
रोहित कसोटीत घरच्या मैदानावर कोहलीपेक्षा बेस्ट? आकडेवारी पाहा अन् ठरवा
वीरू, गब्बरला जे नाही जमलं ते हिटमॅनने करून दाखवलं
गुरुवारी दुसऱ्या दिवशी या जोडीनं दुसरी धाव घेताच 1936सालचा विक्रम मोडला. भारताकडून सलामीला सर्वोत्तम भागीदारी करणाऱ्या जोडीत रोहित-मयांकने दहाव्या स्थानी झेप घेतली. त्यांनी 204 धावांची भागीदारी करताच विजय मर्चंट आणि सय्यद मुश्ताक अली यांचा विक्रम मोडला. या दोघांनी 1936च्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे 203 धावांची सलामी दिली होती. या विक्रमात विनू मंकड आणि पंकज रॉय हे अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी 1956मध्ये चेन्नई कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध 413 धावांची भागीदारी केली होती.
तब्बल दोन वर्ष वाट पाहणाऱ्या रोहित शर्माने सांगितली 'मन की बात'
हिटमॅन रोहितची सॉलिड सुरुवात, 'दी वॉल'च्या विक्रमाशी बरोबरी
रोहित ठरला 'हिट'; पहिल्याच सामन्यात शतक झळकावणारा चौथा ओपनर
रोहित शर्माची सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी; पाहा आकडेवारी