भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत दोन्ही संघांकडून तुल्यबळ खेळ झाला. भारताच्या पहिल्या डावातील 7 बाद 502 धावांच्या प्रत्युत्तरात 431 धावा केल्या. भारतानं 71 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाची सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या डावात रोहित-मयांक जोडीला साजेशी सुरुवात करता आली नाही. मयांक अवघ्या 7 धावा करून माघारी परतला आणि भारताला 21 धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर रोहितनं खिंड लढवत भारताला अर्धशतकी पल्ला पार करून दिला. दुसऱ्या डावात रोहितनं तीन खणखणीत षटकार खेचून इतिहास घडवला.
आर अश्विननं 7 विकेट्स घेतल्या, पण टीम इंडियासाठी त्या महाग ठरल्याभारताच्या आर अश्विननं 145 धावा देत 7 विकेट्स घेतल्या. अश्विनने कसोटीच्या एका डावात पाचवेळा सात विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. पण, त्याची ही कामिगिरी सर्वोत्तम ठरली नाही. त्यानं इंदौर कसोटीत 2016-17मध्ये 59 धावांत 7 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिका ( 7/66, नागपूर 2015-16), वेस्ट इंडिज ( 7/83, नॉर्थ साऊंड 2016), ऑस्ट्रेलिया ( 7/103 चेन्नई, 2012-13) या विक्रमांचा क्रमांक येतो.
शिवाय भारतात सात विकेट्स देण्यासाठी मोजलेल्या सर्वाधिक धावांच्या विक्रमात अश्विनची आजची कामगिरी तिसऱ्या स्थानी येते. यापूर्वी 1949मध्ये दत्तू फडकर यांनी चेन्नई कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध 159 धावांत 7 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर बी चंद्रशेखर यांच्या 157 धावांत 7 विकेट्स ( वि. वेस्ट इंडिज, मुंबई 1966) यांचा क्रमांक येतो. चौथ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचे जीम हिग्स ( 7/143 वि. भारत, चेन्नई 1979) आणि पाचव्या स्थानावर हरभजन सिंग ( 7/133 वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई 2001) यांचा क्रमांक येतो.