भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रोहित शर्मानं दुसऱ्या डावातही शतकी खेळी करून इतिहास घडवला. सलामीवीर म्हणून एकाच कसोटीच्या दोन्ही डावात शतक करणारा सहा भारतीय फलंदाज ठरला. पण, प्रथमच सलामीला येत पहिल्याच सामन्यात अशी कामगिरी करणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान त्यानं पटकावला. रोहितनं पहिल्या डावात 176 धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या डावात त्यानं शतकी खेळी साकारली आहे. कसोटी क्रिकेटमधील रोहितचे हे पाचवे शतक आहे. सलामीवीर म्हणून त्याचे हे दुसरे आणि आफ्रिकेविरुद्धचेही दुसरे शतक आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना त्यानं तीन शतकं केली आहेत.
सलामीवीर म्हणून एकाच सामन्यात दोन्ही डावांत सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. त्यांनी तीन वेळा अशी कामगिरी केली आहे. त्यानंतर राहुल द्रविड (2), रोहित ( 1), विराट कोहली ( 1), अजिंक्य रहाणे ( 1) आणि विजय हझारे ( 1) यांचा क्रमांक येतो.
रोहितनं 'दी वॉल' ओलांडली, भारतात कुणाला न जमलेली कामगिरी केली
रोहितनं एका कसोटीत सर्वाधिक 9 षटकार खेचणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान पटकावला. त्यानं नवज्योत सिंग सिद्धूचा 1994 सालचा 8 षटकारांचा विक्रम आज मोडला. भारताकडून तीनही फॉरमॅटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम रोहितच्या नावावर झाला आहे. रोहितनं वन डेत 2013मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 16, तर ट्वेंटी-20त 2017मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 षटकार खेचले आहेत.
याही पुढे जात रोहितनं दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली. एकाच कसोटीत 100 आणि 50 धावा करणारा रोहित हा भारताचा 17वा सलामीवीर ( एकूण 173 ) ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथमच अशी कामगिरी सलामीवीराने केली आहे. त्याचे हे 11 वे अर्धशतकं आहे. रोहितनं मायदेशात सलग 7 कसोटी सामन्यांत अर्धशतक झळकावले आहे. या कामगिरीसह त्यानं राहुल द्रविडच्या सलग सहा अर्धशतकाचा विक्रम मोडला.
रोहित शर्माचं दे दणादण; वन डे, ट्वेंटी-20 अन् आता कसोटीत पराक्रम
एका कसोटीत सर्वाधिक 9 षटकार खेचणारा रोहित हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. त्यानं नवज्योत सिंग सिद्धूचा 1994 सालचा 8 षटकारांचा विक्रम आज मोडला. भारताकडून तीनही फॉरमॅटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम रोहितच्या नावावर झाला आहे. रोहितनं वन डेत 2013मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 16, तर ट्वेंटी-20त 2017मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 षटकार खेचले आहेत.
Web Title: India vs South Africa, 1st Test : Rohit Sharma becomes the first Indian to smash two centuries in his first two innings as opener
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.