भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत दोन्ही संघांकडून तुल्यबळ खेळ झाला. भारताच्या पहिल्या डावातील 7 बाद 502 धावांच्या प्रत्युत्तरात 431 धावा केल्या. भारतानं 71 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाची सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या डावात रोहित-मयांक जोडीला साजेशी सुरुवात करता आली नाही. मयांक अवघ्या 7 धावा करून माघारी परतला आणि भारताला 21 धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर रोहितनं खिंड लढवत भारताला अर्धशतकी खेळी केली. या अर्धशतकासह रोहितनं दी वॉल राहुल द्रविडचा विक्रम मोडला. आतापर्यंत कोणालाही न जमलेली कामगिरी रोहितनं आज करून दाखवली.
भारताच्या 7 बाद 502 धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेनं 431 धावा केल्या. डीन एल्गर ( 160), फॅफ ड्यू प्लेसिस ( 55) आणि क्विंटन डी कॉक ( 111) यांच्या फटकेबाजीनं आफ्रिकेचा फॉलो ऑन टाळला. सेनूरान मुथूसामीनं नाबाद 33 धावांची खेळी करताना संघाला 431 धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताच्या आर अश्विननं 145 धावा देत 7 विकेट्स घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात रोहितनं एका कसोटीत सर्वाधिक 9 षटकार खेचणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान पटकावला. त्यानं नवज्योत सिंग सिद्धूचा 1994 सालचा 8 षटकारांचा विक्रम आज मोडला. भारताकडून तीनही फॉरमॅटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम रोहितच्या नावावर झाला आहे. रोहितनं वन डेत 2013मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 16, तर ट्वेंटी-20त 2017मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 षटकार खेचले आहेत.
याही पुढे जात रोहितनं दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली. एकाच कसोटीत 100 आणि 50 धावा करणारा रोहित हा भारताचा 17वा सलामीवीर ( एकूण 173 ) ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथमच अशी कामगिरी सलामीवीराने केली आहे. त्याचे हे 11 वे अर्धशतकं आहे. रोहितनं मायदेशात सलग 7 कसोटी सामन्यांत अर्धशतक झळकावले आहे. या कामगिरीसह त्यानं राहुल द्रविडच्या सलग सहा अर्धशतकाचा विक्रम मोडला.
Web Title: India vs South Africa, 1st Test : Rohit Sharma becomes the first player with 7 consecutive 50+ scores in Test cricket on Indian soil
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.