India vs South Africa, 1st Test : प्रथमच ओपनिंगला येणाऱ्या रोहितची 'कसोटी'; कोहलीचा मोलाचा सल्ला 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 03:21 PM2019-10-01T15:21:01+5:302019-10-01T15:26:32+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa, 1st Test: Rohit Sharma coming to openings for the first time in Test; Captain Virat Kohli's give him advice | India vs South Africa, 1st Test : प्रथमच ओपनिंगला येणाऱ्या रोहितची 'कसोटी'; कोहलीचा मोलाचा सल्ला 

India vs South Africa, 1st Test : प्रथमच ओपनिंगला येणाऱ्या रोहितची 'कसोटी'; कोहलीचा मोलाचा सल्ला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. विशाखापट्टणम येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यात सर्वांचे लक्ष्य लागले आहे ते हिटमॅन रोहित शर्मावर... मर्यादित षटकांच्या सामन्यांत यशस्वी सलामीवीर म्हणून आघाडीवर असलेला रोहित प्रथमच कसोटीत ओपनिंग करणार आहे. लोकेश राहुलच्या अपयशामुळे रोहितला ही संधी मिळाली आहे. याआधी रोहितनं कसोटीत कधीच ओपनिंग केली नाही, त्यामुळे उद्याच्या सामन्यात त्याच्यावर प्रचंड दडपण असणार आहे. पण, कर्णधार विराट कोहलीनं सामन्यापूर्वी हिटमॅनला सल्ला दिला आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात अध्यक्षीय एकादश संघाचे नेतृत्व सांभाळताना रोहित सलामीला आला होता. पण, अवघ्या दोन चेंडूंचा सामना करून रोहित भोपळा न फोडताच माघारी परतला. त्यामुळे त्याची फलंदाजी कसोटीत सलामीसाठी उपयुक्त नाही, असे मत व्यक्त केले गेले. मर्यादित षटकांच्या सामन्यातील आक्रमकपणा कसोटीत कामी येणार नाही, असा सल्लाही अनेकांनी लगोलग त्याला देऊन टाकला. 


रोहितनं नोव्हेंबर 2013मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण केले. त्यानंतर 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो शेवटचा कसोटी सामना खेळला. या पाच वर्षांत रोहितनं 27 कसोटींत 39.62 च्या सरासरीनं 1585 धावा केल्या. त्यात 3 शतकं व 10 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितनं आतापर्यंत आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात 3 ते 6 क्रमांकावर फलंदाजी केली आहे. सहाव्या क्रमांकावर त्यानं सर्वाधिक 16 सामन्यांत 1037 धावा केल्या आहेत.  

रोहितच्या सलामीला येण्यावरून पहिल्या कसोटीच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार कोहली म्हणाला,'' रोहित शर्मा कसोटीत सलामीला येण्यासाठी फार उत्सुक असेलच आणि संघालाही ती उत्सुकता लागली आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात तो ज्या पद्धतीनं खेळ करतो, त्यानं कसोटीतही तोच अंदाज कायम राखल्यास संघाच्या ते फायद्याचेच ठरेल. पण, सामन्याचा नूर पाहूनच तो खेळ करेल. टीम इंडियाचे तीन फलंदाज माघारी परतले असताना रोहित खेळपट्टीवर असेल, तर नक्कीच तो मोठे फटके मारणार नाही. तो परिपक्व फलंदाज आहे. त्याच्याकडे बराच अनुभव आहे. त्यानं नैसर्गिक खेळ करावा, अशी त्याच्यासह संघाच्या प्रत्येक खेळाडूची इच्छा आहे. पण, पुन्हा सांगते परिस्थितीचा अंदाज घेऊन तो खेळेल.''

रोहित शर्माने आधीही टेस्टमध्ये केलीय 'ओपनिंग'! 
रोहितनं आतापर्यंत तीन प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत सलामीवीराची भूमिका पार पाडली आहे.  2008-09 च्या रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सौराष्ट्रविरुद्ध रोहितनं 40 चेंडूंत नाबाद 30 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2010-11च्या रणजी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्यानं 73 चेंडूंत 68 धावा केल्या होत्या. 2012-13च्या रणजी स्पर्धेतही पंजाबविरुद्ध त्याला सलामीला खेळण्याची संधी मिळाली होती आणि त्यात त्यानं 11 चेंडूंत 28 धावा केल्या होत्या. पण, या तीनही सामन्यांत अखेरच्या दिवशी रोहितला सलामीला खेळण्याची संधी मिळाली होती. 

Web Title: India vs South Africa, 1st Test: Rohit Sharma coming to openings for the first time in Test; Captain Virat Kohli's give him advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.