भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. कसोटीत प्रथमच सलामीला आलेल्या रोहितनं खणखणीत शतक झळकावून अनेक विक्रमांना गवसणी घातली, तर मयांकनेही त्याला तोडीसतोड साथ दिली. रोहित आणि मयांक प्रथमच सलामीवीर म्हणून कसोटीत एकत्र खेळले. या जोडीनं 59.1 षटकांत 202 धावांची भागीदारी करून इतिहास घडवला.
अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. रोहितने 174 चेंडूंत 12 चौकार व 5 षटकार खेचून 115 धावा केल्या, तर मयांकने 183 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकार खेचून 84 धावा केल्या आहेत. कसोटीत सलामीवीर म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चौथा भारतीय आहे. यापूर्वी शिखर धवनने 2012-13मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली कसोटीत 187 धावांची खेळी केली होती. लोकेश राहुलने 2015मध्ये सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 110 धावा केल्या होत्या, तर पृथ्वी शॉ याने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 134 धावा केल्या आहेत.
रोहितने या कामगिरीसह ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. घरच्या मैदानावर किमान 10 कसोटी डावांत सर्वाधिक सरासरी असलेल्या ब्रॅडमन यांच्या बरोबरीत रोहित आला आहे. ब्रॅडमन यांनी 50 डावांत 4322 धावा केल्या आहेत आणि त्यांची सरासरी 98.22 इतकी आहे. रोहितनं 15 डावांत 98.22च्या सरासरीनं 884 धावा केल्या आहेत. रोहितला हा विक्रम मोडण्याची आज संधी आहे.
हिटमॅन रोहितची सॉलिड सुरुवात, 'दी वॉल'च्या विक्रमाशी बरोबरी
रोहित ठरला 'हिट'; पहिल्याच सामन्यात शतक झळकावणारा चौथा ओपनर
मयांक-रोहितची जोडी जमली; सलामीवीर म्हणून रचला इतिहास
रोहित कसोटीत घरच्या मैदानावर कोहलीपेक्षा बेस्ट? आकडेवारी पाहा अन् ठरवा
वीरू, गब्बरला जे नाही जमलं ते हिटमॅनने करून दाखवलं
तब्बल दोन वर्ष वाट पाहणाऱ्या रोहित शर्माने सांगितली 'मन की बात'