India vs South Africa, 1st Test : रोहितनं पुजाराला शिवी घातली, त्यावरून बेन स्टोक्सनं फिरकी घेतली

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी दमदार अर्धशतकी खेळी करून भारताला मोठ्या आघाडीच्या दिशेनं आगेकूच करुन दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 02:18 PM2019-10-05T14:18:26+5:302019-10-05T14:18:51+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa, 1st Test : Rohit Sharma shouts at Cheteshwar Pujara as the latter fails to complete a run; Ben Stokes make a fun | India vs South Africa, 1st Test : रोहितनं पुजाराला शिवी घातली, त्यावरून बेन स्टोक्सनं फिरकी घेतली

India vs South Africa, 1st Test : रोहितनं पुजाराला शिवी घातली, त्यावरून बेन स्टोक्सनं फिरकी घेतली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी दमदार अर्धशतकी खेळी करून भारताला मोठ्या आघाडीच्या दिशेनं आगेकूच करुन दिली. रोहितनं मायदेशात सलग सात अर्धशतकं झळकावर राहुल द्रविडचा विक्रम मोडला. मयांक अग्रवाल लगेच माघारी परतल्यानंतर रोहित व पुजारानं खिंड लढवत संघाला सावरले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. पण, सामन्यात एक प्रसंग असा घडला की रोहितनं चक्क मैदानावर पुजाराला शिवी घातली. रोहितची ती शिवी स्टम्पमधील माईकवर रेकॉर्ड झाली आणि सोशल व्हायरलही झाली.


रोहितच्या या शिवीवरून इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सनं चांगलीच फिरकी घेतली. कर्णधार विराट कोहलीच्या तोंडून सातत्यानं ही शिवी त्याच्या कानावर पडली होती. पण, यावेळी रोहितनं तशी शिवी दिल्यानं स्टोक्सने फिरकी घेतली.

रोहितनं 'दी वॉल' ओलांडली, भारतात कुणाला न जमलेली कामगिरी केली
रोहितनं एका कसोटीत सर्वाधिक 9 षटकार खेचणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान पटकावला. त्यानं नवज्योत सिंग सिद्धूचा 1994 सालचा 8 षटकारांचा विक्रम आज मोडला. भारताकडून तीनही फॉरमॅटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम रोहितच्या नावावर झाला आहे. रोहितनं वन डेत 2013मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 16, तर ट्वेंटी-20त 2017मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 षटकार खेचले आहेत.  

याही पुढे जात रोहितनं दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली. एकाच कसोटीत 100 आणि 50 धावा करणारा रोहित हा भारताचा 17वा सलामीवीर ( एकूण 173 ) ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथमच अशी कामगिरी सलामीवीराने केली आहे. त्याचे हे 11 वे अर्धशतकं आहे. रोहितनं मायदेशात सलग 7 कसोटी सामन्यांत अर्धशतक झळकावले आहे. या कामगिरीसह त्यानं राहुल द्रविडच्या सलग सहा अर्धशतकाचा विक्रम मोडला. 

रोहित शर्माचं दे दणादण; वन डे, ट्वेंटी-20 अन् आता कसोटीत पराक्रम 
एका कसोटीत सर्वाधिक 9 षटकार खेचणारा रोहित हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. त्यानं नवज्योत सिंग सिद्धूचा 1994 सालचा 8 षटकारांचा विक्रम आज मोडला. भारताकडून तीनही फॉरमॅटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम रोहितच्या नावावर झाला आहे. रोहितनं वन डेत 2013मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 16, तर ट्वेंटी-20त 2017मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 षटकार खेचले आहेत. 

Web Title: India vs South Africa, 1st Test : Rohit Sharma shouts at Cheteshwar Pujara as the latter fails to complete a run; Ben Stokes make a fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.