India vs South Africa 1st Test, Sachin praises Rahul: केएल राहुलचं सेंच्युरियनच्या मैदानावर धडाकेबाज शतक; सचिन तेंडुलकर काय म्हणाला पाहा

लोकेश राहुलने २६० चेंडूंचा सामना करत १२३ धावांची अप्रतिम खेळी केली आणि संघाला भक्कम स्थितीत आणले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 06:47 PM2021-12-28T18:47:47+5:302021-12-28T18:52:08+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa 1st Test Sachin Tendulkar praises KL Rahul for his fabulous century at Centurion | India vs South Africa 1st Test, Sachin praises Rahul: केएल राहुलचं सेंच्युरियनच्या मैदानावर धडाकेबाज शतक; सचिन तेंडुलकर काय म्हणाला पाहा

India vs South Africa 1st Test, Sachin praises Rahul: केएल राहुलचं सेंच्युरियनच्या मैदानावर धडाकेबाज शतक; सचिन तेंडुलकर काय म्हणाला पाहा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs SA 1st Test Day 3 Live: आफ्रिकेच्या मैदानावर लोकेश राहुलने पहिल्याच कसोटीत आपली छाप पाडली. विराटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय राहुलने पुरेपूर सार्थ ठरवला. सुरूवातीला मयंक अग्रवाल, मग विराट कोहली आणि नंतर अजिंक्य रहाणे अशा तीन फलंदाजांच्या साथीने त्याला आपली खेळी रंगवली. राहुलने पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रात अर्धशतक पूर्ण केलं तर तिसऱ्या सत्रात त्याने दमदार शतक झळकावलं. तिसऱ्या दिवशीच्या खेळात राहुल आणखी मोठी खेळी उभारेल अशी अपेक्षा असतानाच तो बाद झाला. पण त्याच्या फलंदाजीचं मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने मात्र तोंडभरून कौतुक केलं.

लोकेश राहुलने २६० चेंडूंचा सामना करत १२३ धावांची खेळी केली. यात १७ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. कगिसो रबाडाच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. सचिनने त्याच्या खेळीचे ट्वीट करून कौतुक केले. दक्षिण आफ्रिकेतील मालिकेच्या सुरूवातीलाच राहुलने दमदार खेळी केली. राहुलने शिस्तबद्ध आणि संयमाने फलंदाजी केली याचा मला आनंद आहे. राहुलच्या दमदार खेळीच्या जोरावरच भारताला पहिल्या डावात चांगली धावसंख्या उभारता आली, अशी शब्दात सचिनने ट्वीट केलं आणि राहुलची पाठ थोपटली.

राहुलने दमदार फलंदाजी करताना एक मोटा विक्रम केला. राहुलने दक्षिण आफ्रिकेत खेळताना वैयक्तिक स्तरावर भारतीय सलामीवीर म्हणून सर्वोत्तम धावसंख्या केली. याआधी रणजी किंग वासिम जाफरने भारतीय संघाकडून आफ्रिकेत खेळताना ११६ धावांची खेळी केली होती. तो विक्रम मोडत राहुलने आज नवा पराक्रम केला.

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे मैदानाबाहेर...

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत असताना त्याचा पाय मुरगळला. पायाच्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याने ओव्हर अर्धवटच सोडली आणि तो ड्रेसिंग रूममध्ये गेला. त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आल्यानंतर चहापानाच्या विश्रांतीआधी तो पुन्हा मैदानात फिल्डींगसाठी हजर झाला.

Web Title: India vs South Africa 1st Test Sachin Tendulkar praises KL Rahul for his fabulous century at Centurion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.