भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : निराशाजनक सुरुवातीनंर आफ्रिकन संघाने तिसऱ्या दिवशी दमदार कमबॅक केले. डीन एल्गनरची दीडशतकी खेळी आणि त्याला कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस आणि क्विंटन डी कॉक यांची साजेशी साथ, याच्या जोरावर आफ्रिकेनं पहिल्या कसोटीवरील टीम इंडियाची पकड सैल केली. एल्गरने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानं दीडशतकी खेळी करताना आफ्रिकेला फॉल ऑन पासून वाचवले. एल्गर बाद झाल्यानंतर क्विंटनने शतक झळकावले. त्याच्या संयमी खेळीच्या जोरावर आफ्रिकेनं दिवसअखेर 8 बाद 385 धावा केल्या. पण, त्याच्या विकेटनं भारताला पुन्हा कमबॅक करण्याची संधी मिळवून दिली आहे. अश्विनने आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी पाठवला.
रोहित शर्माच्या दिडशतकी खेळीनंतर मयांक अग्रवालने केलेल्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने खोऱ्यानं धावा चोपल्या. रोहितने 244 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकार खेचून 176 धावा केल्या, तर मयांकने 371 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकारांसह 215 धावा केल्या. भारताने 7 बाद 502 धावांवर पहिला डाव घोषित केला. त्यानंतर
आर अश्विन ( 2/9) आणि रवींद्र जडेजा ( 1/21) यांनी आफ्रिकेला धक्का देत त्यांची अवस्था 3 बाद 39 अशी केली.
तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच इशांत शर्मानं आफ्रिकेला धक्का दिला. त्यानं टेंबा बवूमाला पायचीत केले. त्यानंतर फॅफ आणि एल्गर यांनी चौथ्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली. अश्विनने फॅफला माघारी पाठवले, पण क्विंटनने एल्गरसोबत खिंड लढवली. फॅफने 103 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकार खेचून 55 धावा केल्या. क्विंटन आणि एल्गर या जोडीनं सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दोघांची 164 धावांची भागीदारी रवींद्र जडेजानं संपुष्टात आणली. एल्गरने 287 चेंडूंत 18 चौकार व 4 षटकारांसह 160 धावा केल्या.
त्यानंतर डी कॉकनं शतक पूर्ण केलं. भारतात शतक झळकावणारा तो आफ्रिकेचा पहिलाच यष्टिरक्षक ठरला, तर एबी डिव्हिलियर्सनंतर ( 2013 वि. पाकिस्तान) आशियात शतक झळकावणारा दुसरा आफ्रिकन यष्टिरक्षकाचा मानही त्यानं पटकावला. क्विंटन 163 चेंडूंत 16 चौकार व 2 षटकारांसह 111 धावा करून माघारी परतला. त्यानंतर जडेजा व अश्विनने आफ्रिकेला धक्के दिले. आफ्रिका आणखी 117 धावांनी पिछाडीवर आहे.
Web Title: India vs South Africa, 1st Test : South Africa reach 385/8 (Elgar: 160, Ashwin: 5/128) at Stumps on Day 3, trail India by 117 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.