भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्माच्या दिडशतकी खेळीनंतर मयांक अग्रवालने केलेल्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या 400 पार धावा चोपल्या. बिनबाद 202 धावांवरून आजचा खेळ सुरू करताच रोहित व मयांकने जोरदार फटकेबाजी केली. रोहितने 244 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकार खेचून 176 धावा केल्या, तर मयांकने 371 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकारांसह 215 धावा केल्या. मयांकचे हे कसोटीतील पहिलेच शतक होते आणि त्याचे त्याने द्विशतकात रुपांतर केले. चेतेश्वर पुजारा ( 6), कर्णधार विराट कोहली ( 20) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे ( 15) यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर वृद्धीमान सहा व रवींद्र जडेजा यांनी फटकेबाजी करत संघाला पाचशे धावांसमीप आले.
भारताच्या धावांचा डोंगर वाढताना पाहून आफ्रिकेचे खेळाडू चक्रावले होते. त्यामुळे त्यांना काय करावेच हेच सुचत नव्हते. सहा व जडेजा यांनी फटकेबाजी करून संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आफ्रिकन खेळाडू आणखी हैराण झाले. सामन्यात असा एक प्रसंग घडला की त्यांना चेंडू शोधता आला नाही. चेंडू शोधण्यासाठी त्यांना मोठ्या स्क्रीनची मदत घ्यावी लागली. त्यानंतर जे चित्र समोर आले त्यावरून काखेत कळसा गावाला वळसा ही म्हण कुणालाही आठवली असेल...
पाहा व्हिडीओ...