IND vs SA: कालपर्यंत मला शिव्या देणारे लोक आज माझी स्तुती करत आहे - केएल राहुल

India Vs South Africa 1st Test Live Updates In Marathi : मंगळवारपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 11:25 AM2023-12-28T11:25:18+5:302023-12-28T11:29:55+5:30

whatsapp join usJoin us
India Vs South Africa 1st Test star player KL Rahul shared insights on how social media criticism impacts players on the field  | IND vs SA: कालपर्यंत मला शिव्या देणारे लोक आज माझी स्तुती करत आहे - केएल राहुल

IND vs SA: कालपर्यंत मला शिव्या देणारे लोक आज माझी स्तुती करत आहे - केएल राहुल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Vs South Africa 1st Test | सेंच्युरियन : दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर भारतीय फलंदाजांना साजेशी खेळी करण्यात अपयश आले. मात्र, यष्टीरक्षक फलंदाज लोकेश राहुल याला अपवाद ठरला. टीम इंडिया अडचणीत असताना राहुलने अप्रतिम शतक झळकावून भारताला सन्मानजनक स्थितीत पोहचवले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटी सामन्यातील शतकानंतर राहुलने मोठे विधान केले आहे. चाहत्यांच्या दुटप्पी वृत्तीवर त्याने टीका केली. लोकेश राहुलच्या म्हणण्यानुसार, आज सोशल मीडियावर जे लोक त्याची स्तुती करत आहेत तेच लोक काही काळापूर्वी त्याला खूप ट्रोल करत होते. सोशल मीडियावरट्रोल केल्याने खेळाडूंमध्ये खूप फरक पडतो, असे त्याने सांगितले. 

दरम्यान, सलामीच्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी कगिसो रबाडाने भारताच्या आशेवर पाणी टाकले. पहिल्या दिवसअखेर भारताने ८ गडी गमावून २०८ धावा केल्या होत्या. भारताने केवळ १२१ धावांत सहा गडी गमावले. लोकेश राहुल ७० धावांवर नाबाद खेळत होता. तर, शार्दुल ठाकूर (२४), जसप्रीत बुमराह (१), आर अश्विन (८), श्रेयस अय्यर (३१), विराट कोहली (३८), शुबमन गिल (२), रोहित शर्मा (५) आणि यशस्वी जैस्वाल (१७) धावा करून तंबूत परतला होता. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक पाच बळी घेतले होते. पण, दुसऱ्या दिवशी राहुलने १०१ धावांची शतकी खेळी करून भारताचा डाव सावरला. १२१ धावांत सहा गडी गमावल्यानंतर टीम इंडियाला तिथून १५० धावा करणे कठीण झाले होते. मात्र, मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या राहुलने सावध खेळी आणि भारताने आपल्या पहिल्या डावात ६७.४ षटकांत सर्वबाद २४५ धावा केल्या. 

ट्रोलिंगमुळे खूप फरक पडतो - राहुल
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर राहुलला ट्रोलिंगबद्दल प्रश्न केला असता त्याने म्हटले, "असे केल्याने मला काय फायदा होईल? लोकांना जे म्हणायचे आहे ते म्हणतील. जर तुम्ही पब्लिक परफॉर्मर असाल तर चांगले प्रदर्शन करूनच टीका टाळू शकता किंवा त्याला उत्तर देऊ शकता. आज जे लोक माझी स्तुती करत आहेत तेच कालपर्यंत मला शिव्या देत होते. सोशल मीडियावरील ट्रोलिंगमुळे खूप फरक पडतो, पण तुम्ही यापासून जितके दूर राहाल, तितके तुमच्या मानसिकतेसाठी चांगले असते."

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

पहिल्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ - 
टेम्बा बावुमा (कर्णधार), डीन एल्गर, एडन मार्करम, टोनी डी जिओर्गी, कीगन पीटरसन, डेव्हिड बॅडिंगहॅम, काइल वॉरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सिन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर. 

Web Title: India Vs South Africa 1st Test star player KL Rahul shared insights on how social media criticism impacts players on the field 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.