भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : आजचा दिवस हा रोहित शर्माचाच होता. पहिल्यांदा रोहित सलामीला आला आणि त्याने शतकाला गवसणी घातली. या शतकानंतर रोहितवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण यानंतर भारताचे माजी तंत्रशुद्ध सलामीवीर आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी एक खुलासा केला आहे.
रोहितने 165 चेंडूंत 11 व 4 षटकार खेचून शतक पूर्ण केले. कसोटीतील त्याचे हे चौथे शतक ठरलं, तर सलामीवीर म्हणून त्याचे हे पहिलेच शतक आहे. योगायोग म्हणजे ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये प्रथम ओपनर म्हणून रोहितनं आफ्रिकेविरुद्धच शतक झळकावले होते. कसोटीत सलामीवीर म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चौथा भारतीय आहे.
रोहितने जेव्हा शतक झळकावले तेव्हा गावस्कर हे समालोचन करत होते. त्यावेळी गावस्कर यांच्याबरोबर माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण होता. रोहितने सलामीला येऊन शतक झळकावल्यावर लक्ष्मणने गावस्कर यांना काही प्रश्न विचारले. त्यावर गावस्कर यांनी खुलासा केला आहे. याबाबत गावस्कर म्हणाले की, " जेव्हा मी सलामीला यायचो तेव्हा डोक्यामध्ये काही प्रश्न असायचे. मी या डावात शून्यावर तर बाद होणार नाही ना, त्याचबरोबर दोन्ही डावांत जर मला भोपळा पण फोडता आला नाही, तर काय करायचे. त्यावेळी मी फलंदाजीला आलो आणि असे प्रश्न सुरु झाले की, लगेच धाव काढायचो आणि या सर्व प्रश्नांना पूर्णविराम द्यायचो."
शतकानंतर रोहित शर्माची सोशल मीडियावर बल्ले-बल्लेकसोटीत प्रथमच सलामीला आलेल्या रोहित शर्माचा खेळ कसा होतो, याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. रोहितनं सुरुवातीला संयमी आणि जम बसल्यावर आपल्या नेहमीच्या अंदाजात खेळ करताना चाहत्यांना खुश केलं. एक सलामीवीर म्हणून रोहितचे हे कसोटी क्रिकेटमधील पहिलेच शतक ठरले. या शतकानंतर सोशल मीडियावर रोहितची बल्ले-बल्ले पाहायला मिळाली.
रोहितने 165 चेंडूंत 11 व 4 षटकार खेचून शतक पूर्ण केले. कसोटीतील त्याचे हे चौथे शतक ठरलं, तर सलामीवीर म्हणून त्याचे हे पहिलेच शतक आहे. योगायोग म्हणजे ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये प्रथम ओपनर म्हणून रोहितनं आफ्रिकेविरुद्धच शतक झळकावले होते. कसोटीत सलामीवीर म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चौथा भारतीय आहे.
तब्बल दोन वर्ष वाट पाहणाऱ्या रोहित शर्माने सांगितली 'मन की बात'आजचा दिवस हा रोहित शर्माचाच होता. पहिल्यांदा रोहित सलामीला आला आणि त्याने शतकाला गवसणी घातली. विक्रमही त्याने रचले. पण तब्बल दोन वर्ष रोहित कसोटी शतकाच्या प्रतिक्षेत होता. पण आता दोन वर्षांनी ही गोष्ट घडल्यावर रोहितने आपले मन मोकळे केले आहे. सामन्यानंतर आपली 'मन की बात' सांगितली आहे.
रोहितनं 165 चेंडूंत 11 व 4 षटकार खेचून शतक पूर्ण केले. कसोटीतील त्याचे हे चौथे शतक ठरलं, तर सलामीवीर म्हणून त्याचे हे पहिलेच शतक आहे. योगायोग म्हणजे ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये प्रथम ओपनर म्हणून रोहितनं आफ्रिकेविरुद्धच शतक झळकावले होते. कसोटीत सलामीवीर म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चौथा भारतीय आहे. यापूर्वी शिखर धवनने 2012-13मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली कसोटीत 187 धावांची खेळी केली होती. लोकेश राहुलने 2015मध्ये सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 110 धावा केल्या होत्या, तर पृथ्वी शॉ याने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 134 धावा केल्या आहेत.रोहित म्हणाला की, " गेल्या दोन वर्षांपासून मी या गोष्टीची वाट पाहत होतो. अखेर दोन वर्षांनी हा योग जुळून आला. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यामध्ये असताना मला सलामीला खेळायला मिळणार, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आता जेव्हा मला ही संधी मिळाली तेव्हा या गोष्टीचा फायदा उचलण्याचे मी ठरवले होते. आजचा खेळही चांगला झाला. त्यामुळे आता यापुढे किती धावा वाढवता येतील, यावर आमचे लक्ष केंद्रीत असेल."