भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मयांक अग्रवाल आणि रोहित शर्मा यांनी भारताच्या सलामीची जबाबदारी खांद्यावर घेतली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यापूर्वी 2015मध्ये दक्षिण आफ्रिकेचा घरच्या मैदानावर सामना केला होता आणि चार सामन्यांच्या मालिकेत यजमानांनी 3-0 अशी बाजी मारली होती. चार वर्षांनंतर निकाल काय लागेल हे येणारा काळच सांगेल, परंतु मैदानावर टॉसला येताच कोहलीनं विक्रम नावावर केला.
घरच्या मैदानावर जवळपास एका वर्षानंतर पहिला कसोटी सामना खेळत आहेत. ऑक्टोबर 2018मध्ये हैदराबाद कसोटीत भारताने वेस्ट इंडिजचा सामना केला होता. त्यानंतर परदेशात भारताने 6 कसोटींपैकी 4 जिंकल्या, तर प्रत्येकी एक सामन्यात पराभव व अनिर्णित निकाल लागला. आजच्या सामन्यात कोहलीनं भारतासाठी सर्वाधिक कसोटीत नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांत सौरव गांगुलीशी बरोबरी केली आहे.
कर्णधार म्हणून कोहलीची ही 49वी कसोटी आहे. या विक्रमात महेंद्रसिंग धोनी 60 कसोटींसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर कोहली (49*), सौरव गांगुली ( 59), मोहम्मद अझरुद्दीन ( 47) आणि सुनील गावस्कर ( 47) यांचा क्रमांक येतो. कोहलीनं एकूण 80 कसोटींत 6749 धावा केल्या आहेत. त्यात 25 शतकं आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. कर्णधार म्हणून त्यानं 4651 धावा केल्या आहेत. त्यात 18 शतकं व 7 अर्धशतकांचा समावेश आहे.