India vs South Africa, 1st Test : द्विशतकवीर मयांक अगरवाल रोहितच्या खेळीबद्दल काय म्हणाला, जाणून घ्या...

सामन्यानंतर जेव्हा मयांकला त्याच्या खेळीबाबत विचारले तेव्हा त्याने रोहितच्या खेळीबद्दल काही वक्तव्य केली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 06:32 PM2019-10-03T18:32:59+5:302019-10-03T18:34:41+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa, 1st Test: What the batsman Mayank Agarwal said about Rohit Sharma's play ... | India vs South Africa, 1st Test : द्विशतकवीर मयांक अगरवाल रोहितच्या खेळीबद्दल काय म्हणाला, जाणून घ्या...

India vs South Africa, 1st Test : द्विशतकवीर मयांक अगरवाल रोहितच्या खेळीबद्दल काय म्हणाला, जाणून घ्या...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्माचे या सामन्यात द्विशतक हुकले. पण या सामन्यात द्विशतक झळकावले ते भारताचा सलामीवीर मयांक अगरवालने. सामन्यानंतर जेव्हा मयांकला त्याच्या खेळीबाबत विचारले तेव्हा त्याने रोहितच्या खेळीबद्दल काही वक्तव्य केली आहेत.

सामन्यानंतर मयांक म्हणाला की, " मी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. कारण द्विशतक झळकावणे सोपे नसते. या खेळीदरम्यान बरेच चढ-उतार आले. काही वेळा संयम बाळगावा लागला तर काही वेळा आक्रमकही व्हावे लागले. हे माझे पहिलेच शतक होते आणि त्याचे मी द्विशतकामध्ये रुपांतर करू शकलो, याचा मला आनंद आहे."

सामन्यानंतर मयांक रोहितबद्दल म्हणाला की, " रोहित आणि मी ज्यापद्धतीने फलंदाजी केली ते पाहता प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडाली होती. काल पाऊस पडला होता आणि त्यानंतर खेळ थांबवण्यात आला होता. त्यामुळे आज सकाळी खेळपट्टी कशी असेल, याचा अंदाज कोणालाही येत नव्हता. पण यावेळी रोहितने फिरकीपटूंवर जो हल्ला चढवला, ते पाहून डोळ्याचे पारणे फिटले."

तब्बल 20 महिन्यांनी पुनरागमन करत साकारली सर्वात जलद खेळी
खेळाडूसाठी प्रत्येक दिवस महत्वाचा असतो. भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने तर तब्बल 20 महिन्यांनंतर भारतीय संघात पुमनरागमन केले. पण पुनरागमन करताना साहाने संघाच्या निर्णयानुसार सर्वात जलद फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले.

हा सामना गाजवला तो भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी. रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल यांनी दुसऱ्या दिवशी धडाकेबाज फलंदाजी केली. रोहितचे द्विशतक हुकले असले तरी मयांकने मात्र द्विशतक झळकावले. पण तरीही या सामन्यात सर्वात जलद खेळी साकारल्याचा मान 20 महिन्यांनंतर संघात परतलेल्या साहाला मिळाला.

साहा जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा संघाला कमी चेंडूंमध्ये जास्त धावा करायच्या होत्या. संघाच्या रणनितीनुसार साहाने यावेळी फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. साहाने 16 चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने 21 धावा केल्या. यावेळी भारतीय फलंदाजांचा स्ट्राइक रेट पाहिला तर त्यामध्ये साहाच अव्वल असल्याचे दिसून येत आहे.


दुसऱ्या दिवशी भारताचा डबल धमाका; आफ्रिका संकटात
भारताकडून दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी डबल धमाका पाहायला मिळाला. भारताचा सलामीवीर मयांक अगरवालकडून आज द्विशतक पाहायला मिळाले आणि दुसऱ्या दिवसावरही भारताचेच वर्चस्व पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवशी भारताने आपला पहिला डाव 7 बाद 502 धावांवर घोषित केला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या दिवसअखेर 3 बाद 39 अशी मजल मारता आली.

रोहित शर्माच्या दिडशतकी खेळीनंतर मयांक अग्रवालने केलेल्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने खोऱ्यानं धावा चोपल्या. बिनबाद 202 धावांवरून आजचा खेळ सुरू करताच रोहित व मयांकने जोरदार फटकेबाजी केली. रोहितने 244 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकार खेचून 176 धावा केल्या, तर मयांकने 371 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकारांसह 215 धावा केल्या. मयांकचे हे कसोटीतील पहिलेच शतक होते आणि त्याचे त्याने द्विशतकात रुपांतर केले. चेतेश्वर पुजारा ( 6), कर्णधार विराट कोहली ( 20) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे ( 15) यांना मोठी खेळी करता आली नाही. भारताने 7 बाद 502 धावांवर पहिला डाव घोषित केला. भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळात तीनशे धावा जोडल्या.

Web Title: India vs South Africa, 1st Test: What the batsman Mayank Agarwal said about Rohit Sharma's play ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.