India Vs South Africa, 1st Test: मोहम्मद शमीचे काय आहे बिर्याणी कनेक्शन, सांगतोय रोहित शर्मा

शमीने दुसऱ्या डावात पाच बळी मिळवत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 07:14 PM2019-10-06T19:14:14+5:302019-10-06T19:14:58+5:30

whatsapp join usJoin us
India Vs South Africa, 1st Test: What is Mohammed Shami's Biryani connection, says Rohit Sharma | India Vs South Africa, 1st Test: मोहम्मद शमीचे काय आहे बिर्याणी कनेक्शन, सांगतोय रोहित शर्मा

India Vs South Africa, 1st Test: मोहम्मद शमीचे काय आहे बिर्याणी कनेक्शन, सांगतोय रोहित शर्मा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात पाच बळी मिळवत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. शमीच्या या कामगिरीचे रहस्य सामनावीर रोहित शर्माने सांगितले आहे.

रोहित म्हणाला की, " यापूर्वीही शमीने भेदक गोलंदाजी केलेली आहे. त्यामुळे त्याची ही गोलंदाजी मी पहिल्यांदाच पाहतोय, असे नाही. मी आणि शमीने 2013 साली एकत्र पदार्पण केले होते, हे अजूनही माझ्या लक्षात आहे. या सामन्यातील खेळपट्टी ही संथ होती. त्यामुळे या खेळपट्टीवर गोलंदाजी करणे, सोपे नसते. "

या सामन्यात शमीने चांगले यॉर्कर टाकले. याबद्दल रोहितला विचारल्या तो म्हणाला की, " शमी हा चांगले यॉर्कर टाकतो, याचे रहस्य बर्याणी आहे."

रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावांमध्ये शतक झळकावले. त्यामुळेच रोहिताला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पण सामनावीर किताब मिळवल्यावर रोहितने एक 'राज की बात' केली आहे.

सामनावीर पुरस्कार पटकावल्यावर रोहित म्हणाला की, " माझ्यासाठी हा पुरस्कार फार खास आहे. संघाच्या विजयात मला योगदान देता आले, ही माझ्यासाठी महत्वाची बाब आहे. पण मला कसोटीमध्ये सलामीला यावे लागेल, हे यापूर्वीच माहिती होते. त्यामुळे बऱ्याचदा मी नवीन चेंडूनेही सराव केला आणि त्याच गोष्टींचा फायदा मला यावेळी झाला."

Web Title: India Vs South Africa, 1st Test: What is Mohammed Shami's Biryani connection, says Rohit Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.