भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने आज 350 बळींचा टप्पा पार केला. यावेळी अश्विनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 350 बळी पटकावल्यावर अश्विनची एक खास मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये अश्विनला बुलेट ट्रेन म्हटले आहे.
अश्विनने जेव्हा 300 बळींचा टप्पा पार केला होता. तेव्हा संघातील सहाय्यक प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी त्याची मुलाखत घेतली होती. ही गोष्ट 2017 साली नागपूर येथे घडली होती. फार कमी कालावधीमध्ये अश्विनने या सामन्यात 350 बळींचा टप्पा गाठला. यावेळीही त्याची मुलाखत श्रीधर यांनी घेतली आणि त्याला बुलेट ट्रेन असे म्हटला आहे.
मोहम्मद शमीचे काय आहे बिर्याणी कनेक्शन, सांगतोय रोहित शर्माभारताने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात पाच बळी मिळवत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. शमीच्या या कामगिरीचे रहस्य सामनावीर रोहित शर्माने सांगितले आहे.
रोहित म्हणाला की, " यापूर्वीही शमीने भेदक गोलंदाजी केलेली आहे. त्यामुळे त्याची ही गोलंदाजी मी पहिल्यांदाच पाहतोय, असे नाही. मी आणि शमीने 2013 साली एकत्र पदार्पण केले होते, हे अजूनही माझ्या लक्षात आहे. या सामन्यातील खेळपट्टी ही संथ होती. त्यामुळे या खेळपट्टीवर गोलंदाजी करणे, सोपे नसते. "
या सामन्यात शमीने चांगले यॉर्कर टाकले. याबद्दल रोहितला विचारल्या तो म्हणाला की, " शमी हा चांगले यॉर्कर टाकतो, याचे रहस्य बर्याणी आहे."