केपटाऊन - भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेच्या पहिली कसोटीसामन्यातील पहिल्या डावात भरवश्याच्या फलंदाजांनी आपल्या विकेट फेकल्यानंतर भुवनेश्वरच्या साथीनं हार्दिकने(93) भारताची इज्जत राखली. हार्दिक पांड्यांच्या अर्धशतकाच्या बळावर भारतानं 209 धावापर्यंत मजल मारली. पहिल्या डावात भारत आणखी 77 धावांनी पिछाडीवर आहे.
आफ्रिकेच्या 286 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची पहिल्या डावात सुरुवात खराब झाली. आफ्रिकन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे भारताची आघाडीची फळी कोलमडली.सलामीवीर शिखर धवन, मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहली यांच्यानंतर आता रोहित शर्मा आणि पुजार देखील बाद झाले.
वृद्धमान सहाही लवकर बाद झाल्याने संघ अडचणीत आला होता. पण अष्टपैलू हार्दिक पांड्याने दमदार खेळी करत भारताचा डाव सावरला.
हार्दीक 93 आणि भुवनेश्वर कुमार 25 यांच्या फलंदाजीच्या जोरावर पहिल्या डावात भारतानं 209 धावसंख्या उभारली.रोहित आणि चेतेश्वर पुजारा या काल नाबाद असणाऱ्या जोडीने आज सुरुवात चांगली केली होती हे दोघेही संयमाने फलंदाजी करत होते. पण यांची भागीदारी जास्तवेळ रंगू न देता पहिल्या डावाच्या २९ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रबाडाने रोहितला पायचीत केले.रोहितने ५९ चेंडूत ११ धावा केल्या. याआधीही भारताने काल पहिल्या तीन फलंदाजांचे बळी लवकर गमावले होते. काल मुरली विजय(१), शिखर धवन(१६) आणि विराट कोहली(५) हे लवकर बाद झाले होते.