अयाझ मेमन, संपादकीय सल्लागारसेंच्युरियन येथे दुस-या कसोटी सामन्यात भारताला यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला तसेच मालिकाही गमवावी लागली. ही भारतासाठी खूप निराशाजनक बाब ठरली. कारण या दौ-यावर भारतीय संघ ‘नंबर वन’ टीम म्हणून गेली होती. परदेशी दौ-यावर या संघाकडून खूप चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. भारतीय संघ विदेशी दौ-यात चांगले प्रदर्शन करत नाही, हे टीकाकारांचे मत बदलण्यात टीम इंडिया या वेळी यशस्वी ठरेल, अशी आशा होती. पण असे काहीच झाले नाही. पहिला सामना ७२ धावांनी, तर दुसरा सामना १३५ धावांनी हरले. त्यातल्या त्यात पहिल्या सामन्यात भारत दक्षिण आफ्रिकेला झुंजवू शकतो अशी आशा निर्माण झाली होती, दुस-या सामन्यात मात्र भारतीयांची दाणादाण उडाली. यामुळे डेÑसिंगरूममध्ये नक्कीच उदासीचे वातावरण असेल. कारण, ही मालिका जिंकण्याची क्षमता संघाकडे होती आणि जिंकण्याची संधी भारताने वाया घालवली आहे. त्यामुळे केवळ कर्णधार विराट कोहलीच नाही, तर सर्वच खेळाडूंना मोठ्या काळापर्यंत या अपयशाची खंत राहील.पराभवाचे कारण काय होते? माझ्या मते पराभवास गोलंदाजांना जबाबदार धरू शकत नाही. दोन कसोटी सामन्यांत आपल्या गोलंदाजांनी ४० बळी मिळवले. शिवाय अधिक धावाही दिल्या नाहीत. जिथे टक्कर देण्याचा प्रश्न आहे, तिथे फलंदाजांची आघाडीची फळी पूर्णपणे अपयशी ठरली. पहिल्या कसोटीत हार्दिकच्या ९३ व दुसºया कसोटीत कोहलीच्या १५३ धावा बाजूला काढल्या, तर इतर कोणतेही अर्धशतक भारताकडून झालेले नाही. संघात जे बदल करण्यात आले, तेही अपयशी ठरले. धवनच्या जागी संधी देण्यात आलेला लोकेश राहुल, मुरली विजय अपयशी ठरले. चेतेश्वर पुजाराही सपशेल अपयशी ठरला. अनुभवी पार्थिव पटेलही फार काही करू शकला नाही. त्यामुळे संघाची फलंदाजी विस्कळीत भासली. तांत्रिक आणि संयम या दोन्ही बाबतींत संघ अपयशी ठरला. विराटने अप्रतिम खेळी केली; पण इतरांकडून मोलाची साथ मिळाली नाही. त्यामुळे आता भारतीय संघ कागदी वाघ आहेत की केवळ भारतीय खेळपट्टीवरच वाघ आहेत हा वादाचा विषय ठरेल. कारण आता आफ्रिकेत परदेशी खेळपट्टीवर ही दशा झाली आहे, तर पुढे येणाºया इंग्लंड व आॅस्टेÑलिया दौºयावर कशी कामगिरी होणार याबाबत आतापासूनच प्रश्न उपस्थित होत आहेत.फलंदाज केवळ अपयशीच नाही ठरले, तर ते ज्या प्रकारे खेळले ते अत्यंत निराशाजनक होते. चेतेश्वर पुजारावरून कळेल की भारतीय फलंदाज कोणत्या मानसिकतेने खेळत होते. दोन्ही डावांत तो धावबाद झाला. पहिल्या डावात आवश्यकता नसताना एक धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. दुसºया डावातही आवश्यकता नसताना तिसरी धाव काढताना धावबाद झाला. हार्दिक पंड्या ९३ धावा काढल्यानंतर असे वाटते की तो बाद होण्यासाठीच खेळत आहे. रोहित शर्माने खूप निराश केले आहे. जरी त्याने अखेरच्या डावात अर्धशतकापर्यंत मजल मारली असली, तरी तो परदेशात कसोटी खेळू शकत असल्याचा विश्वास निर्माण करू शकला नाही. शिखर धवनच्या बाबतीतही तेच म्हणावे लागेल.भारत अजूनही क्रमवारीत अव्वल स्थानी आहे, पण आता मालिका एका अडचणीच्या आणि खूप मोठ्या कठीण वळणावर आली आहे. मालिकेपूर्वी केलेले सर्व दावे आता अपयशी ठरले असून संघात जे बदल केले, त्याचाही काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आता सर्व गोष्टी ठीक करण्याचे टीम इंडियापुढे मोठे आव्हान आहे. जर संघाने अखेरची लढत अनिर्णित राखली, तर प्रतिष्ठा राहील आणि जिंकली तर या दौºयात काहीतरी मिळवल्यासारखे होईल. त्यामुळे अखेरचा सामना जिंकण्याचाच प्रयत्न कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा असेल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India Vs South Africa 2018 : आता प्रतिष्ठा जपण्याचे आव्हान
India Vs South Africa 2018 : आता प्रतिष्ठा जपण्याचे आव्हान
सेंच्युरियन येथे दुस-या कसोटी सामन्यात भारताला यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला तसेच मालिकाही गमवावी लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 3:56 AM