Join us  

India Vs South Africa 2018 : तिसऱ्या दिवशी पावसाची बॅटिंग

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरू असलेल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे.  स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता पावसानं उघडीप घेतली होती...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2018 5:22 PM

Open in App

केपटाऊन - भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरू असलेल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे.  स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता पावसानं उघडीप घेतली होती. पण आता आलेलेल्या वृत्तानुसार, पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे.  पावसामुळं तिसऱ्या दिवशी किती षटकांचा खेळ होणार? आतापर्यंत पावसामुळे दोन सत्रे वाया गेली आहेत. 

( आणखी वाचा : पहिल्या कसोटीपूर्वीच द. आफ्रिकेनं केला भारताचा अपमान, तुम्हालाही येईल राग )

केपटाऊनमध्ये पहाटे 3 वाजल्यापासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. रविवारी दुपारी तीन वाजेपर्यंत पाऊस सुरू राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. पावसामुळे तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या दोन सत्रातील खेळ वाया गेला आहे. दरम्यान पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने खेळ कधी सुरू होणार अद्याप निश्चित सांगता येत नाही. पाऊस थांबल्यानंतर मैदानाची तपासणी करण्यात येईल आणि त्यानंतर खेळ सुरू करायचा अथवा नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल.

( आणखी वाचा - दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! विराटसेनेसाठी मात्र खूशखबर )

दरम्यान, दुसऱ्या डावात आफ्रिकेन दोन बाद 62 धावा केल्या असून त्यांच्याकडे आता 142 धावांची आघाडी आहे.  दुसऱ्या दिवशी हार्दिक पांड्याने केलेल्या 93 धावांच्या जोरावर भारताने केपटाऊन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी, कमी धावसंख्येत बाद होण्याची नामुष्की टाळली. भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्याने केलेल्या 99 धावांच्या भागिदारीमुळे भारताने 200 धावांचा टप्पा ओलांडला. पहिल्या डावात आफ्रिकेला 142 धावांची आघाडी मिळाली असली तरीही डेल स्टेनची दुखापत आणि दुसऱ्या डावात सलामीवीरांचं लवकर माघारी परतणं यामुळे भारताने या कसोटीत आपलं आव्हान कायम राखलं आहे.

( आणखी वाचा धक्कादायक! कोहलीची विकेट लागली त्याच्या जिव्हारी, घेतले स्वत:ला पेटवून ) 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८हार्दिक पांड्या