मुंबई- भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा 72 रन्सने पराभव झाला. गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी करत दुसऱ्या डावात आफ्रिकन फलंदाजांची दाणादाण उडवली. धमाकेदार गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेचा खेळ दुसऱ्या डावात 130 रन्समध्ये आटोपला. भारताच्या या पराभवानंतर नेटीझन्सने सोशल मीडियावरून टीम इंडियाला चांगलंच लक्ष केलं.
आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या 130 धावांत गुंडाळल्याने भारतासमोर विजयासाठी 208 धावांचे माफक आव्हान होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच भारताची फलंदाजीही फिलँडरच्या वेगवान माऱ्यासमोर कोसळली. त्यामुळे भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या कसोटीमधील विजयासह भारताने कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
भारतीय संघाच्या या पराभवानंतर चाहत्यांचा राग अनावर झाल्याने त्यांनी सोशल मीडियावर कॅप्टन विराट कोहलीवर सडकून टीका करायला सुरूवात केली. भारतीय टीममधील फलंदाजांवर नेटीझन्सने निशाणा साधला. विराट कोहली 28 रन्सकरून स्वस्तात बाद झाल्यामुळे त्यालाही टीकेचा धनी केलं.
विराट कोहलीवरून लग्नाचा फिव्हर अजून गेलेला नाही, असं एका युजरने म्हंटलं. गोलंदाज रन्स करतात, गोलंदाजचं विकेट घेतात मग फलंदाज काय करता आहे? असं मत एका युजरने म्हंटलं. टीम फक्त घरच्या मैदांनामध्ये चांगलं खेळते, असंही मत काहींनी व्यक्त केलं. बाहेरच्या देशात विराट अयशस्वी ठरतो तेथे फक्त धोनीचं चांगली कामगिरी करू शकतो, असंही नेटीझन्सने म्हंटलं.