Join us  

IND vs SA, 2nd ODI Ishan Kishan : मी शतकासाठी नाही, तर टीम इंडियासाठी खेळतो! ९३ धावा करणाऱ्या इशान किशनने जिंकली मनं, Video 

India vs South Africa 2nd ODI : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवताना मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 4:14 PM

Open in App

India vs South Africa 2nd ODI : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवताना मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. रांचीत झालेल्या या सामन्यात लोकल बॉय इशान किशनने ( Ishan Kishan) चाहत्यांची मनं जिंकली. इशान ८४ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांसह ९३ धावांवर माघारी परतला.इशान व श्रेयस यांनी  १६१ धावांची भागीदारी केली. श्रेयस १११ चेंडूत १५ चौकारांच्या मदतीने ११३ धावांवर नाबाद राहिला. भारताने ४५.५ षटकांत ३ बाद २८२ धावा करून भारताला ७ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. या सामन्यात इशानचे शतक हुकल्याचे सर्वांना वाईट वाटले, परंतु सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत इशानच्या विधानाने सर्वांची मनं जिंकली.

भारतीय संघ ठरला जगात भारी; त्रिशतकीय विजयाचा विश्वविक्रम, नोंदवले अनेक पराक्रम

झारखंडचा इशान किशन म्हणाला,''आम्ही नेहमीच शिकण्याचा प्रयत्न करत असतो. झालेल्या चुकांची नोंद करून त्या  सुधारण्याचा प्रयत्न असतो. माझे शतक हुकले, परंतु देशाच्या विजयासाठी ९३ धावा याही उपयुक्त ठरल्या. शतक हुकल्याचे खंत सर्वांनाच होते, परंतु पुढच्या वेळेत अशा परिस्थितीत असताना मी शतक पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. स्ट्राईक रोटेट करण्याची कला काही खेळाडूंमध्येच असते. काही खेळाडू ताकदीच्या जोरावर खेळतात. अनेक खेळाडू माझ्यासारखा षटकार खेचू शकत नाही, मी सहजतेनं ते करून जातो. षटकार मारणं हे माझे बलस्थान आहे.''

''आताच्या क्रिकेटमध्ये रोटेशन हे महत्त्वाचे आहे. पण, माझ्या डोक्यात हे येत नाही. शतकासाठी ७ धावा हव्या असताना मी एकेक धाव घ्यायला हवी होती, असा विचार तुमच्या डोक्यात आला असे. पण, मी असं क्रिकेट खेळत नाही. जर समोर चेंडू फटका मारण्यासारखा असेल तर तो मी उत्तुंग टोलावणारच. मी त्यावेळी माझ्या वैयक्तिक धावांचा विचार करणार नाही.  मी भारतीय संघासाठी खेळतोय आणि जर मी माझ्या धावांचा विचार करत असेल, तर मी माझ्या चाहत्यांशी प्रतारणा करेन, असं होईल,'' असेही तो म्हणाला.   

 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाइशान किशनश्रेयस अय्यर
Open in App