सौरव गांगुली लिहितात...भारत व दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ युवा प्रतिभा शोधण्याच्या प्रक्रियेत व्यस्त आहेत. भारताने २०१९ विश्वकप स्पर्धेनंतर वेस्ट इंडिज दौऱ्यापासून या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. काही युवा खेळाडूंचा शोध लागला असून निवड समिती मोठे लक्ष्य पुढे ठेवून विश्वास असलेल्या खेळाडूंना पुरेशी विश्रांती देण्यात येत आहे. गेल्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी फार चर्चा झाली आणि ही चांगली बाब नाही. चांगल्या खेळाडूंची निवड करीत त्यांना नियमितपणे संधी द्यायला हवी.विराट, रोहित, शिखर, हार्दिक आणि जडेजा यांनी आपली छाप सोडली असून युवा खेळाडूंनी पुढे सरसावत संघाला पुढची पातळी गाठून द्यायला हवी. गोलंदाजीत भारताचे भविष्य उज्ज्वल भासत आहे. खलिल अहमद, नवदीप सैन, दीपक चहार यांच्याकडून अपेक्षा आहेत. बुमराहप्रमाणे त्यांची कामगिरी कशी विकसित होईल, याकडे भारतीय संघव्यवस्थापनाला लक्ष द्यावे लागेल. रोल मॉडेल म्हणून या खेळाडूंपुढे बुमराह, भुवी, शमी यांचा आदर्श आहे. फिरकीपटू राहुल चहर, वाशिंग्टन सुंदर, कुलदीप, चहल हेसुद्धा वर्चस्व गाजवत आहेत.फलंदाजीतही काही चांगले चेहरे आहेत. श्रेयस अय्यरला वेस्ट इंडिजमध्ये ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्याचे बक्षीस मिळाले असून त्याला टी२० संघात स्थान मिळाले. रोहित व शिखर सलामीला सर्वोत्तम जोडी असून त्यानंतर लोकेश राहुल आहे. फॉर्मात नसल्यामुळे त्याने कसोटी संघातील स्थान गमावले आहे. चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर, मनीष पांडे यांच्यामुळे चुरस आहे. हार्दिकचे पुनरागमन झाल्यामुळे संघ मजबूत झाला आहे. तो सर्वच प्रकारच्या क्रिकेटसाठी भारताचा अव्वल अष्टपैलू आहे.द. आफ्रिका संघ संक्रमणाच्या स्थितीत आहे. विश्व क्रिकेटसाठी ही निराशाजनक बाब आहे. त्यांनी संघबांधणीच्या प्रक्रियेसाठी आॅस्ट्रेलियाकडून बोध घ्यायला हवा. संघाच्या भविष्याचा विचार करता डिकॉककडून मोठ्या अपेक्षा आहेत. या दौºयाच्या निमित्ताने डिकॉक, रबाडासारख्या खेळाडूंनी पुढे सरसावत संघात वरिष्ठ खेळाडूंची जबाबदारी स्वीकारायला हवी. अलीकडच्या कालावधीत त्यांची फलंदाजीत घसरण झाली. मोठी धावसंख्या उभारण्यासाठी दर्जेदार फलंदाजाचा शोध घेणे त्यांच्यापुढे आव्हान आहे. या युवा दक्षिण आफ्रिकन संघापुढे भारताला भारतात लढत देणे म्हणजे खरंच परीक्षा आहे. (गेमप्लॅन)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs South Africa, 2nd T-20 : दोन्ही संघ युवा प्रतिभा शोधण्यास प्रयत्नशील
India vs South Africa, 2nd T-20 : दोन्ही संघ युवा प्रतिभा शोधण्यास प्रयत्नशील
विराट, रोहित, शिखर, हार्दिक आणि जडेजा यांनी आपली छाप सोडली असून युवा खेळाडूंनी पुढे सरसावत संघाला पुढची पातळी गाठून द्यायला हवी.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:34 PM