Join us  

India vs South Africa, 2nd T-20: क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर, मोहालीमध्ये होणार धावांचा पाऊस

या सामन्यावर पावसाचे सावट नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मोहाली येथील सामन्यात धावांचा पाऊस अनुभवायला येणार असल्याचे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 4:56 PM

Open in App

मोहाली, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : जोरदार पावसामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला ट्वेन्टी-20 सामना रद्द करण्यात आला. धर्मशाला येथे दुपारी चार वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरु झाला. त्यानंतर सतत पाऊस पडत असल्यामुळे मैदानातील संपूर्ण पाणी बाहेर काढता येत नव्हते. पंचांनी मैदानाच्या परिस्थितीची पाहणी केली आणि अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. भारताचा आता दुसरा सामना मोहाली येथे होणार आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मोहाली येथील सामन्यात धावांचा पाऊस अनुभवायला येणार असल्याचे म्हटले जात आहे.

धर्मशाला येथील सामना पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण मोहालीमध्ये मात्र पावासाचे वातावरण नाही. मोहालीमध्ये सध्याच्या घडीला 28 ते 31 डिग्री एवढे तापमान आहे. त्यामुळे मोहालीमध्ये पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्यानेही सांगितले आहे.

गेल्या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ट्वेन्टी-20 मालिका जिंकली होती. त्यामुळे ही मालिका जिंकण्यासाठी भारतावर जास्त दडपण असल्याचे म्हटले जात आहे. त्यामध्येच पहिला सामना रद्द करावा लागला आहे. त्यामुळे आता मालिकेत फक्त दोनच सामने उरले आहेत. हे दोन्ही सामने जिंकल्यास भारताला मालिका जिंकता येईल, पण एक जरी सामना भारताने गमावला तर त्यांना मालिका जिंकता येणार नाही.

दुसऱ्या सामन्यामध्ये पावसाची शक्यता फक्त 5 ते 10 टक्के वर्तवण्यात आली आहे. सामना सुरु झाल्यावर अर्ध्या तासामध्ये पावसाचे आगमन होऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण हा पाऊस जोरदार नसेल, त्याचबरोबर जास्त वेळ पावसामुळे वाया जाणार नाही, असे म्हटले जात आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात आता पाऊस बाजी मारणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

 विराटसह टीम इंडियाची सुरक्षा रामभरोसे, चंदिगड पोलिसांचा सुरक्षा पुरवण्यास नकार, कारण...भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा ट्वेंटी-20 सामना बुधवारी चंदिगड येथे होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी खेळाडूंना सुरक्षा पुरवण्यात चंदिगड पोलिसांनी नकार दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) खेळाडूंच्या सुरक्षेसाठी देण्यात येणारी 9 कोटी रक्कम अद्याप खात्यात जमा न केल्यामुळे पोलिसांनी हा पवित्रा घेतली आहे. 

दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघ मोहाली विमानतळावर दाखल होताच मोहाली पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवली. पण, चंदिगड पोलिसांची हद्द सुरू होताच ते माघारी फिरले. पण, बीसीसीआयनं सुरक्षा पुरवण्यासाठीची रक्कमच जमा न केल्यानं चंदिगड पोलिसांनी संघांना सुरक्षा पुरवण्यास नकार दिला.  दरम्यान खाजगी सुरक्षकांच्या देखरेखीखाली संघ हॉटेलमध्ये सुरक्षित पोहोचले आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका