India vs South Africa, 2nd T20 : परत ये, परत ये, महेंद्रसिंग धोनी परत ये... चाहत्यांनी केली मागणी

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा वारसदार म्हणून पंतकडे पाहिले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 04:49 PM2019-09-19T16:49:53+5:302019-09-19T16:55:02+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa, 2nd T20: Come back, come back, Mahendra Singh Dhoni ... fans demand | India vs South Africa, 2nd T20 : परत ये, परत ये, महेंद्रसिंग धोनी परत ये... चाहत्यांनी केली मागणी

India vs South Africa, 2nd T20 : परत ये, परत ये, महेंद्रसिंग धोनी परत ये... चाहत्यांनी केली मागणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मोहाली, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताचा युवा यष्टीरक्षक हा सातत्याने फ्लॉप होताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यातही पंतला फक्त चार धावाच करता आल्या. त्यामुळे आता पंतला वगळून धोनीला संघात स्थान द्यायला हवे, अशी मागणी चाहते करत आहेत.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा वारसदार म्हणून पंतकडे पाहिले जात आहे. आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून निवड समितीनंही पंतला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या. पण, पंतच्या सततच्या अपयशानंतर धोनीला परत बोलावण्याची मागणी होत आहे. आफ्रिकेविरुद्ध सामन्यात अपयशी ठरल्यानंतर नेटिझन्सने पंतचा चांगलाच समाचार घेतला.

पंतला कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी चौथ्या क्रमांकाचे महत्वाचे स्थान दिले. गेल्या दहा सामन्यांमध्ये पंत नऊ वेळा आऊट झाला आहे. त्याचबरोबर सातवेळा तर त्याला दोन अंकी धावसंख्याही उभारता आलेली नाही. त्यामुळे आता पंतला वगळून धोनीला संधी द्या, अशी मागणी चाहते करताना दिसत आहेत.

 


रिषभ पंतचा घडा भरला, रवी शास्त्रींनी दिली वॉर्निंग
भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतचा चुकांचा घडा आता भरल्याचे दिसत आहे. कारण भारताचे मुख्य कोच रवी शास्त्री यांनी पंतला चांगलाच दम भरला आहे. यापुढे जर पंतकडून चुका होत राहील्या तर त्याला संघातून बाहेर काढण्यात येईल, असे शास्त्री यांनी स्पष्ट केले आहे.


शास्त्री यांनी पंतच्या चुकांचे काही दाखले दिले आहेत. शास्त्री म्हणाले की, "वेस्ट इंडिजमध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथील सामन्यात पंत पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. त्याच्यासमोर कर्णधार विराट कोहली हा खेळपट्टीवर होता आणि भारतीय संघ धावांचा पाठलाग करत होता. त्यावेळी संघाला पंतच्या धावांची गरज होती. पण पंत पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. त्यामुळे यापुढे जर पंत असाच खेळत राहीला तर त्याला संघात स्थान मिळणार नाही."
पंतच्या गुणवत्तेबाबत शास्त्री म्हणाले की, " पंतच्या गुणवत्तेबाबत आम्हाला काहीच शंका नाही. यापूर्वीच त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. पण पंतचे शॉट सिलेक्शन चुकताना पाहायला मिळते. सामन्यामध्ये जशी परिस्थिती आहे त्यानुसार प्रत्येकाने खेळ करायचा असतो, पण हे पंतला आतापर्यंत जमलेले नाही. कारण त्याने बऱ्याच वेळा संघाच्या अपेक्षांची पूर्ती केलेली नाही. त्यामुळे यापुढे जर पंत असाच खेळत राहीला तर नक्कीच त्याचे संघातील स्थान धोक्यात आहे."

Web Title: India vs South Africa, 2nd T20: Come back, come back, Mahendra Singh Dhoni ... fans demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.