मोहाली, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : मोहाली येथे बुधवारी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताने विजय मिळवला. पण या सामन्यात रिषभ पंतला पाच चेंडूंमध्ये फक्त चार धावाच करता आल्या. आता तर पंतला तिसऱ्या सामन्यात चमकदार कामिगिरी करता आली नाही तर त्याला डच्चू देण्यात येऊ शकतो. पण पंतला डच्चू दिल्यावर महेंद्रसिंग धोनीला नाही तर एका युवा यष्टीरक्षकाला संधी देण्यात येऊ शकते, असं चाहते म्हणत आहेत. हा युवा यष्टीरक्षक आहे तरी कोण...
आतापर्यंत आयपीएलमध्ये या युवा यष्टीरक्षकाने चमकदार कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये यष्टीरक्षणाबरोबरच त्याने चमकदार फलंदाजीही केली आहे. त्यामुळे जर आता पंतला संघातून वगळले तर या युवा खेळाडूला भारतीय संघाची लॉटरी लागू शकते.
हा युवा यष्टीरक्षक आहे इशान किशन. आयपीएलमध्ये इशानने दमदार कामगिरी केली आहे. सध्याच्या घडीला भारताला चांगल्या यष्टीरक्षकाबरोबर उपयुक्त फलंदाजाची गरज आहे. चौथ्या क्रमांकावर पाठवूनही पंत बऱ्याचदा फेल झालेला आहे. त्यामुळे आता पंतला संधातून वगळल्यावर किशनला संघात स्थान मिळू शकते, असे चाहते म्हणत आहेत.
रिषभ पंतचा घडा भरला, रवी शास्त्रींनी दिली वॉर्निंगभारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतचा चुकांचा घडा आता भरल्याचे दिसत आहे. कारण भारताचे मुख्य कोच रवी शास्त्री यांनी पंतला चांगलाच दम भरला आहे. यापुढे जर पंतकडून चुका होत राहील्या तर त्याला संघातून बाहेर काढण्यात येईल, असे शास्त्री यांनी स्पष्ट केले आहे.
शास्त्री यांनी पंतच्या चुकांचे काही दाखले दिले आहेत. शास्त्री म्हणाले की, "वेस्ट इंडिजमध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथील सामन्यात पंत पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. त्याच्यासमोर कर्णधार विराट कोहली हा खेळपट्टीवर होता आणि भारतीय संघ धावांचा पाठलाग करत होता. त्यावेळी संघाला पंतच्या धावांची गरज होती. पण पंत पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. त्यामुळे यापुढे जर पंत असाच खेळत राहीला तर त्याला संघात स्थान मिळणार नाही."पंतच्या गुणवत्तेबाबत शास्त्री म्हणाले की, " पंतच्या गुणवत्तेबाबत आम्हाला काहीच शंका नाही. यापूर्वीच त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. पण पंतचे शॉट सिलेक्शन चुकताना पाहायला मिळते. सामन्यामध्ये जशी परिस्थिती आहे त्यानुसार प्रत्येकाने खेळ करायचा असतो, पण हे पंतला आतापर्यंत जमलेले नाही. कारण त्याने बऱ्याच वेळा संघाच्या अपेक्षांची पूर्ती केलेली नाही. त्यामुळे यापुढे जर पंत असाच खेळत राहीला तर नक्कीच त्याचे संघातील स्थान धोक्यात आहे."