Join us  

India vs South Africa, 2nd T20 : मोहालीत टीम इंडियाच भारी, पण डेव्हिड मिलरची कामगिरी लै भारी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : उभय संघांमधील ट्वेंटी-20 मालिकेचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आणि आज मालिकेतील दुसरा सामना मोहाली येथे होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 1:05 PM

Open in App

मोहाली, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : उभय संघांमधील ट्वेंटी-20 मालिकेचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आणि आज मालिकेतील दुसरा सामना मोहाली येथे होणार आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना होणार आहे. मोहालीतील या स्टेडियमवरील दोन्ही संघांची कामगिरी पाहता टीम इंडियाचे पारडे जड वाटत असले तरी दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरकडून संघाला धोका आहे. जाणून घेऊया कसा...

  • मायदेशात टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदाही ट्वेंटी-20 सामना जिंकता आलेला नाही. 2015च्या मालिकेत उभय संघांत भारतात दोन सामने झाले आणि दोन्ही सामने आफ्रिकेने धावांचा पाठलाग करून जिंकले. 
  • भारतीय संघाने मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन सामने खेळले आहेत. 2009मध्ये श्रीलंका आमि 2016च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाला भारताने येथे पराभूत केले होते.
  • दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने मोहालीत चार सामने खेळले आहेत आणि त्यात पैकी दोन सामन्यांत ( वन डे, 1993 आणि कसोटी, 2015) आफ्रिकेला यजमानांकडून हार मानावी लागली. पण, उर्वरित दोन सामन्यांत आफ्रिकेनं ( पाकिस्तान, 2006 आणि नेदरलँड्स 2011) विजय मिळवले आहेत.
  • भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 13 ट्वेंटी-20 सामने झाले आहेत आणि त्यापैकी 8मध्ये भारताने विजय मिळवला आहे. 
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक 341 धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितनं ट्वेंटी-20मधील पहिले शतकं हे 2015मध्ये आफ्रिकेविरुद्धच केले होते.
  • मोहालीत ट्वेंटी-20 प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये आफ्रिकेचा डेव्हीड मिलर ( 730) दुसऱ्या स्थानी आहे.  

संभाव्य संघ भारत : विराट कोहली ( कर्णधार) , रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीन सैनी. 

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डि कॉक (कर्णधार), रॉसी व्हॅन डेर डुसेन, तेंबा बावुमा, ज्युनिअर डाला, ब्योर्न फोर्चुन, बुरान हेंड्रीक्स, रीजा  हेंड्रीक्स, डेव्हिड मिलर, एनरिच नोर्जे, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरीयस, कागिसो रबाडा, तरबेझ शम्सी, जॅन जान स्मट्स.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीपंजाब