मोहाली, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर दमदार विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने भारतापुढे विजयासाठी 150 धावांचे आव्हान ठेवले होते. कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने हे आव्हान सात विकेट्स राखत सहज पूर्ण केले. या विजयासह भारताने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
विजयी आव्हानाचा पाठलाग करताना भारता रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला, रोहितला 12 धावा करता आल्या. रोहित बाद झाल्यावर कोहली आणि धवन यांची चांगलीच जोडी जमली. धवनने 40 धावांची खेळी साकारली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी रचली. पण धवन बाद झाल्यावर रिषभ पंतही चार धावांवर बाद झाला. पण त्यानंतर कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
आफ्रिकेची धडाकेबाज फलंदाजी; भारतापुढे दमदार आव्हानकर्णधार क्विंटन डीकॉक आणि तेंदा बवुमा यांच्या दमदार खेळींच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या दोघांच्या दमदार खेळींमुळेच दक्षिण आफ्रिकेला भारतापुढे 150 धावांचे आव्हान ठेवता आले.
भारताने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. क्विंटन डीकॉकने सुरुवातीपासूनच जोरदार हल्ला भारताच्या गोलंदाजीवर चढवला. क्विंटन डीकॉकने 37 चेंडूंत आठ चौकारांच्या जोरावर 52 धावांची खेळी साकारली. क्विंटन डीकॉक बाद झाल्यावर पदार्पण करणाऱ्या बवुमाने भारताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. बवुमाने तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 49 धावा केल्या.
हवेत उडी मारत कोहलीची सुपर कॅच, पाहा व्हिडीओभारताचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात हवेत उडी मारत एक सुपर कॅच पकडल्याचे पाहायला मिळाले. कोहलीने हवेत सूर घेतला तेव्हा बऱ्याच जणांच्या काळजाचा ठोका चुकला होता. पण कोहलीने हवेत उडी मारल्यावरही हातातला चेंडू सोडला नाही.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डीकॉक भारताच्या गोलंदाजीवर प्रहार करत होता. त्याने अर्धशतकही पूर्ण केले. पण नवदीप डीकॉकचा झेल हवेत उंचावर उडाला. कोहली या चेंडूचा पाठलाग करत होता. अखेर कोहलीने उडी मारत ही कॅच पकडली आणि डीकॉकला तंबूचा रस्ता दाखवला.
कोहली आणि शास्त्री यांनी केली 80 वर्षे क्रिकेटची सेवा करणाऱ्या व्यक्तीचा सत्कारतब्बल 80 वर्षे क्रिकेटची सेवा करणाऱ्या भारताच्या या व्यक्तीचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सत्कार केला. सामना सुरु होण्यापूर्वी कोहली आणि शास्त्री यांनी दलजित सिंग यांचा सत्कार केल्याचा व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.
वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी यष्टीरक्षक म्हणून क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हापासून ते क्रिकेटची सेवा करत आहेत. 1961 साली त्यांनी पहिल्यांदा क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवले आणि आतापर्यंत ते आतापर्यंत ते क्रिकेटची सेवा करत होते. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी असो किंवा विराट कोहली, कुणाचेही पान त्यांच्याशिवाय हलत नव्हते. त्यामुळेच त्यांच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटची हानी झाल्याचे म्हटले जात आहे. यष्टीरक्षक म्हणून ते 87 प्रथम श्रेणी सामने खेळले. यामध्ये त्यांनी 3964 धावा करताना सात शतके आणि 19 अर्धशतके लगावली. त्याचबरोबर यष्ट्यांमागे त्यांनी 225 बळी मिळवले. क्रिकेट खेळल्यानंतर त्यांनी जवळपास 22 वर्षे पीच क्युरेटर म्हणूनही काम पाहिले. बीसीसीआयने त्यांना भारतातील क्युरेटरचे प्रमुखही बनवले होते.