मोहाली, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : तब्बल 80 वर्षे क्रिकेटची सेवा करणाऱ्या भारताच्या या व्यक्तीचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सत्कार केला. सामना सुरु होण्यापूर्वी कोहली आणि शास्त्री यांनी दलजित सिंग यांचा सत्कार केल्याचा व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.
वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी यष्टीरक्षक म्हणून क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हापासून ते क्रिकेटची सेवा करत आहेत. 1961 साली त्यांनी पहिल्यांदा क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवले आणि आतापर्यंत ते आतापर्यंत ते क्रिकेटची सेवा करत होते. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी असो किंवा विराट कोहली, कुणाचेही पान त्यांच्याशिवाय हलत नव्हते. त्यामुळेच त्यांच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटची हानी झाल्याचे म्हटले जात आहे. यष्टीरक्षक म्हणून ते 87 प्रथम श्रेणी सामने खेळले. यामध्ये त्यांनी 3964 धावा करताना सात शतके आणि 19 अर्धशतके लगावली. त्याचबरोबर यष्ट्यांमागे त्यांनी 225 बळी मिळवले. क्रिकेट खेळल्यानंतर त्यांनी जवळपास 22 वर्षे पीच क्युरेटर म्हणूनही काम पाहिले. बीसीसीआयने त्यांना भारतातील क्युरेटरचे प्रमुखही बनवले होते.
पाच वर्षांनंतर हार्दिक पंड्या झाला होता दुखापतग्रस्त, हे होतं कारणभारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला गेले दोन महिने क्रिकेटपासून लांब होता. कारण दोन महिन्यापूर्वी हार्दिकला त्रास जाणून लागला होता. हा त्रास पाच वर्षांनंतर पंड्याला जाणवू लागला होता. त्यामुळे दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पंड्याने या सामन्यात पुनरागमन केले आहे.
पाच वर्षांपूर्वी पंड्या पाठिच्या दुखापतीने त्रस्त झाला होता. ही दुखापत त्याची पुन्हा एकदा बळावली, त्यामुळे त्याने विश्रांतीचा निर्णय घेतला होता. दुखापतीवर उपचार केल्यानंतर पंड्या आता पूर्णपणे फिट आहे.
याबाबत पंड्या म्हणाला की, " गेले दोन महिने मी क्रिकेटपासून लांब होतो. कारण माझे पाठिचे दुखणे पुन्हा एकगा सुरु झाले होते. पाच वर्षांपूर्वी मला असाच त्रास झाला होता. पण आता दुखापतीवर मी उपचार घेतले आहेत. त्याचबरोबर फिट राहण्यासाठी बरीच तयारीही केली आहे."
मोहालीची खेळपट्टी कशी असेल, सांगत आहेत सुनील गावस्करमोहाली येथे काही मिनिटांमध्ये दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्याला सुरुवात होणार आहे. सध्यातरी सामन्यावर पावसाचे सावट दिसत नाही. पण मोहालीची खेळपट्टी असेल तरी कशी, याबाबत भारताचे माजी महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
मोहालीच्या खेळपट्टीबाबत गावस्कर म्हणाले की, " खेळपट्टीवर जास्त गवत ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळे चेंडू बॅटवर सहजपणे येईल. पण जसा चेंडू जुना होत जाईल तसा तो बॅटवर थोड्या उशिराने येईल. खेळपट्टीवर काही काळे डाग आहेत, त्यामुळे कालांतराने चेंडू संथगतीने येईल."